पुरुष प्रधान संस्कृतीत महिलांनी महिलांच्या विकासासाठी पाठबळ द्यावे- धनश्री विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 25, 2021

पुरुष प्रधान संस्कृतीत महिलांनी महिलांच्या विकासासाठी पाठबळ द्यावे- धनश्री विखे

 पुरुष प्रधान संस्कृतीत महिलांनी महिलांच्या विकासासाठी पाठबळ द्यावे- धनश्री विखे

सेवाप्रीतच्या उमंग फेस्टमध्ये नारी शक्तीचा जागर; सामाजिक कार्याबद्दल जसपाल नारंग, संदीप कुसळकर व हरजितसिंह वधवा पुरस्काराने सन्मानित


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः घर-संसार सांभाळून सामाजिक योगदान देणार्या महिलांचे कार्य प्रेरणादायी आहे. पुरुष प्रधान संस्कृतीत महिलांनी महिलांच्या विकासासाठी पाठबळ दिले पाहिजे. सेवाप्रीतने महिलांच्या कला-गुणांना वाव व व्यवसायाला चालना देण्यासाठी उमंग फेस्टचा उपक्रम दिशादर्शक असल्याची भावना धनश्री विखे पाटील यांनी केले.
महिलांच्या सक्षमीकरणा-साठी व अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने बुरुडगाव रोड येथील अंकुर लॉनमध्ये भरविण्यात आलेल्या उमंग 2021 फेस्टच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका शितल जगताप, डॉ. प्रियंका मिटके, सिमा गुलाटी (मुंबई) आदी उपस्थित होत्या.
पुढे बोलताना धनश्री विखे म्हणाल्या की, महिलांना वेळ, आर्थिक, कुटुंबाचे नियोजन करून इतर कामे करावी लागतात. सेवाप्रीतची प्रत्येक महिला आपल्या परीने योगदान देत आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमाला हातभार लावण्याची गरज असून, अशा मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ईश्वरी कौस्तुभ काळे या विद्यार्थिनीने गणेश वंदना सादर केली. यावेळी शालेय विद्यार्थिनींचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. उपस्थित पाहुण्यांनी उमंग फेस्टमध्ये महिलांच्या विविध स्टॉलला भेट दिली. प्रास्ताविकात फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, 2015 पासून सेवाप्रीत फाउंडेशन सामाजिक योगदान देत आहे. विविध क्षेत्रातील महिलांनी एकत्र येऊन सामाजिक कार्य उभे केले आहे. महिलांनी एकत्र येऊन लावलेल्या सामाजिक कार्याच्या रोपाचे वटवृक्ष  बहरले आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासह वंचित, दुर्बल घटकातील व अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शितल जगताप यांनी महिलांनी घराबाहेर पडून आपले कर्तृत्व सिध्द केले पाहिजे. अनेक महिला व्यवसाय व औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असून, छोट्याश्या व्यवसायातून त्यांनी मोठे प्रकल्प उभे केले असल्याचे त्यांनी सांगितले.
नारी शक्तीचा जागर करीत उमंग फेस्टचा कार्यक्रम रंगला होता. सामाजिक कार्यात विशेष योगदान दिल्याबद्दल होमिओपॅथी तज्ञ जसपाल नारंग, युवान संस्थेचे संदीप कुसळकर व घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, डॉ. सिमरन वधवा, गिता नय्यर, सविता चड्डा, सुशिला मोडक, अनू थापर, रितू वधवा, गिता माळवदे, निशा धुप्पड, स्विटी पंजाबी आदी उपस्थित होते. उमंग फेस्ट मध्ये महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. उमंग फेस्टला शहरातील महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.  या फेस्टच्या माध्यमातून जमा झालेले पैसे अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी खर्च केले जाणार असल्याचे सेवाप्रीतच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment