वृध्देला बाथरूममध्ये कोंडून सोनेे लुटणारे दोघे गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

वृध्देला बाथरूममध्ये कोंडून सोनेे लुटणारे दोघे गजाआड.

 वृध्देला बाथरूममध्ये कोंडून सोनेे लुटणारे दोघे गजाआड.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पारनेर तालुक्यातील वाकुंज वस्ती वासुंदे येथील सौ. बबईबाई विठ्ठल हिंगळे वय 80 यांना पिण्याचे पाणी मागण्याचा बहाना करत बाथरूम मध्ये कोंडून, जखमी करून त्यांचे गळ्यातील 52 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरणार्‍या विजय मोहिते रा. दरोडी ता. पारनेर व मनोज रमेश पवार रा.जुन्नर या दोघांना ताब्यात घेऊन सोन्याचे मंगळसुत्र व डोरले (25 ग्रॉम वजनाचे दागिने) व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकुण 1,35,000/- रु किंमतीच्या मुद्देमालसह आरोपीस  पारनेर पोस्टे येथे हजर केले असुन, पुढील कार्यवाही पारनेर पोस्टे करीत आहे.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी कि, दिनांक 09/12/21 रोजी फिर्यादी सौ. बबई विठ्ठल हिंगडे वय 80, रा. वाकुंजवस्ती, वासुंदे, ता. पारनेर या सकाळी 11.45 वा.चे दरम्यान घरात एकट्याच असतांना अज्ञात इसम बंगल्याच्या उघड्या गेटमधुन आत येवून पाणी पिण्याचा बहाणा केला व घरात प्रवेश करुन, फिर्यादीस उचलून बाथरुममध्ये कोंडुन, धारदार हत्याराने जखमी करुन, फिर्यादीचे गळ्यातील 52,000/- हजर रुपये किंमतीचे 25 ग्रॉम वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने चोरुन नेले होते. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी पारनेर पोस्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ढ907/29 भादविक 394, 452, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता..
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीतांचा शोध घेवून गुन्हा उघडकिस आणणेकामी मा. श्री. मनोज पाटीला सो, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी श्री अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्वतंत्र पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.
त्या आदेशा प्रमाणे पोनि/श्री. अनिल कटके, स्थागुशा अ.नगर यांनी चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून तपासबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अधिकारी व अंमलदार गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पोनि/अनिल कटके यांना गोपनिय माहित मिळाली की, सदरचा गुन्हा हा विजय मोहिते रा.दरोडी, ता. पारनेर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई/सोपान गोरे, सफी/राजेंद्र वाघ, सफो/संजय खंडागळे, पोहेकॉ/ बापू फोलाने, पोना/भिमराज खर्से, देवेंद्र शेलार व चालक पोहेकॉ/ संभाजी कोतकर अशांनी मिळून दरोडी, ता. पारनेर येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन आरोपी  (1) विजय जगन्नाथ मोहिते वय 38, रा. दरोडी, ता. पारनेर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्हयाबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास अधिक विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्यांचा साथीदार मनोज रमेश पवार रा. जुन्नर, जिल्हा पुणे यांनी मिळुन केला असल्याची माहिती दिल्याने सादर माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे 2) मनोजा रमेश पवार वय 28, रा. जुन्नर, जिल्हा पुणे यांना वेगवेगळ्या ठिकाणाहुन ताब्यात घेतले घेण्यात आले.
ही कारवाई  मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभकुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, अजित पाटील  उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment