पालकमंत्र्यांच्या घोषणेचा बोजवारा प्रशासन म्हणते तशा सुचना नाहीत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

पालकमंत्र्यांच्या घोषणेचा बोजवारा प्रशासन म्हणते तशा सुचना नाहीत

 पालकमंत्र्यांच्या घोषणेचा बोजवारा प्रशासन म्हणते तशा सुचना नाहीत

लस न घेतलेल्यांना डिझेल, पेट्रोल व रेशनवर प्रतिबंध


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लसीकरण मोहीम राबवण्यासाठी आणि नागरिकांनी लस घ्यावी यासाठी ज्या नागरिकांनी एकही डोस घेतली नाही अशा नागरिकांना डिझेल पेट्रोल तसेच रेशन कार्ड वरील सेवा बंद करण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरल्या दिसून येत आहे.करण याबबत जिल्हा प्रशासनाने ही जबाबदारी एकमेकांवर ढकलून असतानाच मंत्रालयातून याबाबतच्या काही सूचना आल्या नसल्याचे उत्तर दिले आहे.
 त्यामुळे पालकमंत्री फक्त घोषणे साठी नगर मध्ये येतात का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगी बाबत तसेच बंद पडलेल्या ऑक्सीजन प्लांट बाबत असेल आणि इतर काही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पालकमंत्र्यांनी फक्त होईल करू, चौकशी होईल यापुढे एकही उत्तर दिले नाही. आणि त्यानंतर त्या समस्या आहे तिथेच आहे त्यामुळे फक्त पालकमंत्री नगर मध्ये येऊन पत्रकार परिषद घेऊन होईल करू आणि विविध घोषणा करुन जातात पुढे त्याचा काहीच उपयोग होत नाही. पालकमंत्री फक्त घोषणा मंत्री होऊ नये हीच नागरकरांची आता इच्छा आहे.

No comments:

Post a Comment