शाळा जशाच्या तशा सुरूच राहतील ः राजेश टोपे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 25, 2021

शाळा जशाच्या तशा सुरूच राहतील ः राजेश टोपे

 शाळा जशाच्या तशा सुरूच राहतील ः राजेश टोपे

ओमायक्रॉनचा धोका वाढला राज्यात नवे नियम लागू


मुंबई :
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच राहिल असं सांगतानाच राज्यातील शाळेबाबत सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. शाळा जशाच्या तशा सुरू राहतील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केलं.
राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. शाळांबाबतही सरकार काय निर्णय घेणार असा प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांना उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना राजेश टोपे यांनी शाळांबाबत तूर्तासतरी सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे सध्या शाळा सुरु आहेत, तशाच त्या सुरु राहितील, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. मात्र चिमुकल्यांच्या लसीकरणाबाबत सरकारही प्रयत्नशील आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय.

No comments:

Post a Comment