कोपरगावमधून प्रतिबंधित गुटखा जप्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 25, 2021

कोपरगावमधून प्रतिबंधित गुटखा जप्त.

 कोपरगावमधून प्रतिबंधित गुटखा जप्त.

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे ची कार्यवाही.
67 हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त-एक आरोपी ताब्यात.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला तसेच शरीरास अपायकारक होईल असा सुगंधी तंबाख मिश्रीत गुटखा, पानमसाला सप्तसुंगी मंदिराजवळ खडकी वॉर्ड क्र 1 मध्ये कोपरगाव शहर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आढळून आला. गुटखा विक्री करणार्‍या सचिन  विजय कटाळे वय 30 रा . खडकी वार्ड क्र 1 कोपरगाव यास ताब्यात घेवुन पंचासमक्ष घर झडती घेतली असता त्याचे राहते घरात पानमासाला, गुटखा असा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला 67,220 रू. किमतीचा मुददेमाल मिळुन आला.
हा सदरचा माल हा कोणाकडुन विकत घेतला असे पकडलेल्या इसमास पंचासमक्ष विचारले असता त्याने सांगितले की, सदरचा माल हा शेरखान पठाण रा . कोपरगाव यांचेकडून विकत घेतल्याचे सांगितले.  माल जप्त करुन पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे यांनी आरोपीस ताब्यात घेतलेे .  
महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधी तम्बाकु मिश्रीत गुटखा , पानमसाला हा मानवी शरीरास अपायकारक, मूच्छांकारक नशाकारक किंवा अपथ्यकारक आहे हे माहित असतांनाही त्याची विक्री करण्याचे उद्देशाने प्रतिबंधीत सुगंधी तंम्बाखु मिश्रीत गुटखा, पानमसाला मिळुन आला आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोळुंके यांनी आरोपी विरुध्द कायदेशीर फिर्याद दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,पोलीस नाईक सचिन अडबल, पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरूट,राहुल सोळंके ,पोलीस कॉन्स्टेबल रंजीत जाधव कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक रामकृष्ण खारतोडे,पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे यांनी केली आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करत आहेत.

No comments:

Post a Comment