वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ दिल्यास कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 31, 2021

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ दिल्यास कारवाई.

 अन्न व औषध प्रशासनाचा इशारा.

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ दिल्यास कारवाई.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दैनंदिन वृत्तपत्रांमध्ये छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाई ही केमिकलयुक्त असल्यामुळे न्युजपेपरमध्ये गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करून ग्राहकांना देणे धोकादायक आहे. सर्व अन्न व्यावसायिक व भेळ विक्रेते यांनी न्यूजपेपरमध्ये अन्न पदार्थाचे पॅकिंग त्वरीत बंद करावे, अन्यथा अन्न सुरक्षा व मानदेयदया अंतर्गत फडक कारवाई करण्यात येईल, असा ईशारा अन्न व औषध प्रशासन अहमदनगर कार्यालयाचे सहायक आयुक्त सं.पा शिंदे यांनी दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हयातील सर्व अन्न व्यावसायिक, वडापाव, पोहे यासारखे अन्नपदार्थ न्युजपेपरमध्ये बांधुन देणार्‍या अन्न व्यावसायिक यांना कळविण्यात येते की, वडापाव, पोहे यासारखे अन्नपदार्थ न्युजपेपरमध्ये बांधुन देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. न्युजपेपरमध्ये अन्न पदार्थाचे पॅकिंग त्वरीत बंद करावे. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत.
जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा संपूर्ण देशात यापूर्वीच लागु करण्यात आला आहे. लोकांमार्फत बाहेरुन नास्ता मागविला जातो.त्यावेळी अन्न व्यावसायिक हे वडापाव, पोहे यासारखे अन्न पदार्थ न्यूजपेपरमध्ये बांधुन देतात, त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो असेही पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment