भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटींचा निधी मंजूर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 28, 2021

भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटींचा निधी मंजूर.

 भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटींचा निधी मंजूर.

संग्राम जगतापांचे प्रयत्नांना यश.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भुईकोट किल्ल्याला देशामध्ये एक ऐतिहासिक महत्त्व आहे.अशा ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे आपले प्रथम कर्तव्य लागते. यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी भुईकोट किल्ला सुशोभिकरण करण्यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 90 लाखाचा पहिला हप्ता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्त झाला असल्याची माहिती आ.संग्राम जगताप यांनी दिली.
याबाबत माहिती देताना आ.जगताप पुढे म्हणाले की, शहराला सांस्कृतिक,धार्मिक,ऐतिहासिक वारसा लाभला आहे हा वारसा जतन करण्यासाठी मी एक पाऊल टाकले आहे. या सुशोभीकरणाच्या माध्यमातून नगर शहराच्या पर्यटन वाढीला मदत होणार आहे.
या निधीच्या माध्यमातून भुईकोट किल्ल्याची संरक्षण भिंत,किल्ला परिसर स्वच्छता,पार्किंग शेड,अंतर्गत प्रसाधनगृह,पाथवे दुरुस्ती व पुरातन काळातील खापरी पाइपलाइनची दुरुस्ती तसेच लॉन सुशोभीकरण, अंतर्गत रस्त्यांची कामे, किल्ला परिसरातील इमारतींची दुरुस्ती,विद्युतीकरण आधी कामे करण्यात येणार असल्याचेही जगताप म्हणाले.

No comments:

Post a Comment