विद्यार्थी कोरोना मुक्त होत नाही तोपर्यंत मीच त्यांचा पालक - आ. लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 28, 2021

विद्यार्थी कोरोना मुक्त होत नाही तोपर्यंत मीच त्यांचा पालक - आ. लंके

 विद्यार्थी कोरोना मुक्त होत नाही तोपर्यंत मीच त्यांचा पालक - आ. लंके

निलेश लंकेचा कोरोना रुग्णांना आधार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात काल पुन्हा एकदा विद्यालयातील आणखी 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या विद्यालयातील बाधितांचा आकडा आता 70 वर गेला आहे. अजून आकडा वाढण्याची शक्यता असून, आमदार नीलेश लंके यांनी काल रात्री उशिरा कोरोना बाधितांची भेट घेऊन जोपर्यंत विद्यार्थी कोरोनामुक्त होणार नाहीत. तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक आहे असा आधार देत कोरोना बाधित असणार्‍या विद्यार्थ्यांची रूग्णालयात जाऊन भेट घेत या सर्वांना आधार दिला आहे.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे असलेल्या केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात चार दिवसांत 82 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या कोरोना बाधितांवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लंके यांनी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना बाधित विद्यार्थ्यांची भेट घेतली व मानसिक आधार देत त्यांचे मनोबल वाढवून काळजी न करण्याच आवाहन केलं तसेच नवोदय विद्यालयास पण भेट दिली. पालकांनी व विद्यार्थीनी घाबरून जाऊ नये, काळजी करू नये. उपचारासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाईल, सर्वोतम उपचार केले जातील. जोपर्यंत विद्यार्थी कोरोनामुक्त होणार नाहीत, तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक आहे व या सर्व बाधित रुग्णांचा सर्व लागणारा खर्च निलेश लंके प्रतिष्ठान संस्थे मार्फत मोफत केला जाईल.असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment