अवैद्य बायोडिझेल विक्री रॅकेटवर कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 2, 2021

अवैद्य बायोडिझेल विक्री रॅकेटवर कारवाई.

 अवैद्य बायोडिझेल विक्री रॅकेटवर कारवाई.

पावणे तीन कोटींचा मुद्देमाल जप्त; 11 जण गजाआड.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात लहान मोठ्या गावात बायोडिझेल विकणार्‍या टोळ्या अवैधपणे बायोडिझेलची विक्री करत आहेत. केंद्र शासनाचा बायोडिजेल विक्रीसाठी परवाना आहे. पण शासनमान्य बायोडिझेल व सध्या जिल्ह्यात विक्री होत असलेले बायोडिझेल यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. ऑईल व रॉकेल मिक्स करून हे रसायन बायोडिझेल नावाने विकले जात आहे. बेकायदेशीर विक्री होत असलेल्या बायोडिझेलचे मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणून नगर तालुक्यातील वाटेफळ शिवारातून 3 ट्रॅक्टर, 2 ट्रकसह तब्बल पावणेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त करून 11 आरोपींना अटक करून 16 जणांच्या विरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बायोडिझेल प्रकरणात आजपर्यंत सर्वात मोठ्या कारवाईची नोंद झाली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोन शासकीय पंच व पुरवठा निरीक्षक वैशाली गजानन शिकारे, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे उपस्थित पंचनामा करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सोपान रमेश गोरे यांचे फिर्यादीनुसार अविनाश पोपटराव नाटक (रा. दूधसागर सोसायटी, केडगाव, नगर), बंडू बाळासाहेब जगदाळे (रा. रूईछत्तीशी, ढा. नगर), विजय अशोक वाडेकर (रा.मंगलगेट, कोठला, नगर), योगेश भगवान गंगेकर (रा. वाटेफळ, ता. नगर), चंद्रकांत शेख सोनोणे (रा. रुईछत्तीशी, ता. नगर), अस्लम मुबारक सय्यद (रा. वाटेफळ ता. नगर), मुजमील राजू पठाण (रा. सातपुते गल्ली, केडगाव, नगर), सचिन दशरथ लामखडे (रा. कातळवेढा, ( ता. पारनेर), कंटेनर (एमएच 46 एआर त 2477) वरील ड्रायव्हर अरुण माधयन(रा. तासम नायकूमपट्टी, वमन्नूर सेलम, तामिळनाडू), ट्रक (टीएन 52 जे 7288) वरील ड्रायव्हर वेडीआप्पा गंगा दूरई (रा. तांडरामपट्ट, तृणामलाई, तमिळनाडू), ट्रक (टीएन 52 एच 7485) वरील ड्रायव्हर बाबासाहेब सखाराम बोरकर (रा. भोयरे पठार, ता. नगर), संजय अशोक साबळे, राजेंद्र अशोक साबळे, (दोघे रा. केडगांव बायपास, निल हॉटेलचे मालक, नगर), राहुल मच्छिंद्र गोरे (रा. रूईछत्तीशी, ता.नगर), विकास भामरे (रा. रुईछत्तीशी ता. नगर), रवी गोरे (रा. रूईछत्तीशी, ता. नगर) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ताब्यात घेतलेल्या इसमाकडे जप्त करण्यात आलेल्या बायो डिझेल बाबत कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार संजय अशोक साबळे, रा. निल हॉटेल, केडगांव बायपास, केडगाव, अहमदनगर याचे व त्याचे साथीदारांचे सांगण्यावरुन विक्री करीत असल्याचे सांगीतले. त्यावरुन साथीदार आरोपींचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.
उपविभागीय पोलिस अधिक्षक अजित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने सोलापूर रोडवरील वाटेफळ शिवारात छापा टाकला. यावेळी 3 ते 2 ट्रक बायोडिझेलची खुलेआम विक्री करताना आढळून आली. यावेळी 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत संजय अशोक सावळे, राजेंद्र अशोक साबळे, राहुल मच्छिंद्र गोरे, विकास भामरे, रवी गोरे यांच्या सांगण्यावरून आम्ही बायोडिझेल विक्री करतो, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी बायोडिझेल इंधनाचा साठा व विक्री करण्यास निर्बंध असताना, अवैधरित्या साठा करून व बेकायदशीररित्या विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, पोहेकॉ संदीप पवार, पोहेकॉ विष्णू घोडेचोर, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकाँभाऊसाहेब काळे, पोना लक्ष्मण खोकले, पोना संदीप दरंदले, पोना रविकिरण सोनटक्के, पोना दीपक शिंदे, पोना संतोष लोढे, पोना सचिन आडवल, मच्छिंन्द्र बडे, योगेश सातपुते, रोहित येमूल, सागर ससाणे, मयूर गायकवाड, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, रविंद्र घुंगासे, जयराम जंगले, अर्जुन बढे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील कार्यवाही तोफखाना पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी करीत आहेत.संजय अशोक साबळे याची माहिती घेतली असता तो सध्या जेलमध्ये असून आरोपी संजय अशोक सावळे याचे विरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हा दाखल झालेला आहे.

No comments:

Post a Comment