24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 21, 2021

24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको

 २४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना

जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,,

नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीनगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

   पीडित शाळकरी मुलगी व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी जवळे ग्रामस्थांनी काल २१ ऑक्टो रोजी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत बस्थानकावर रस्ता रोको केला ,व संतप्त नागरिकांनी  नराधमांना पकडून चौकात फाशी देण्याची मागणी केली

गावात भर वस्तीत घर असताना दिवसा ढवळ्या अज्ञात आरोपीने इयत्ता दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचा घरात घुसून तिच्याचर अत्याचार करत तिला अमानुष पणे ठार मारण्यात आले या घटनेला सुमारे २७ तास उलटून गेले तरी आरोपींचे धागे दोरे   पोलिसांच्या हाती मात्र अजून ही काहीच लागले नसल्याचे चित्र आहे  त्यामुळे अद्याप परिसरात भीतीचे वातावरण आहे   नेमके पोलीस करतात काय ,? असा सवाल या निमित्ताने नागरिकांमधून उपस्थित होत आहे तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून अत्याचाराच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे सर्वत्र या घटनेचा निषेध केला जात असून जवळा ग्रामस्थांनी संघटित होऊन गुन्हेगारांना पकडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही पोलीस यंत्रणेने केले आहे सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागूनही कसून तपास चालू आहे तरी आरोपी गळाला लागत नसल्याने  आरोपींनी ही पोलिसांपुढे मोठे तपासाचे आव्हान उभे केले आहे 


मनोज पाटील पोलीस अधीक्षक-

प्रकरणाचा सखोल तपास चालू असून पोस्ट मोर्टम रिपोर्ट आल्यानंतर मुख्य तपासाला आणखी गती मिळेल,,


सरपंच जवळे सौ अनिता आढाव

महिला घरातच सुरक्षित नाही बाहेर पडून काय करणार ? ,,महिलांना असुरक्षिततेची जाणीव व मनात भीती  वाटू लागली आहे तरी या घटनेचा कडक शब्दात निषेध करत  आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे

No comments:

Post a Comment