दिवाळीनंतर नगर बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 2, 2021

दिवाळीनंतर नगर बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी!

 दिवाळीनंतर नगर बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी!

जिल्हा उपनिबंधकांनी मागवली नगर बाजार समिती मतदारांची यादी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
अनेक वर्षापासून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे वर्चस्व असलेल्या नगरचा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दिवाळीनंतर होणार असून सहकार कायद्यातील नवीन नियमानुसार जिल्हा उपनिबंधक ही निवडणूक घेणार आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने नगर बाजार समितीच्या मतदारांची यादी मागविली आहे.
नगरच्या बाजार समितीची निवडणूक लागणार असल्याने नगर शहर आणि तालुक्यातील राजकीय वातावरण दिवाळीनंतर ढवळून निघाणार आहे. नगर शहरातील बाजार समितीच्या आवारातील गाळ्यांचा मुद्यावर चांगलेच आरोप प्रत्यारोप होणार आहेत. नगरच्या बाजार समितीचा वार्षिक उलाढाल ही पाच कोटींपेक्षा अधिक आहे. पूर्वी जुन्या कायद्यानूसार तीन कोटीच्या आत उलाढाल असणार्या बाजार समित्यांची निवडणूक सहकार खाते घेत होते. तर पाच कोटी अथवा त्यापेक्षा अधिक उलाढाल असणार्या बाजार समित्यांची निवडणूक जिल्हाधिकारी घेत होते. मात्र, नवीन कायद्यानूसार आता सर्व बाजार समित्यांच्या निवडणुका या सहकार खाते घेणार आहेत.
त्यानूसार नगरचे जिल्हा उपनिबंधक हे निवडणूक निर्णय अधिकारी राहणार असून त्यांनी बाजार समितीला मतदार यादी मागवली आहे. बाजार समितीचे सभासद असणारे व्यापारी, हमाल आणि मापाडीची याची यादी बाजार समिती सादर करणार असून ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी यांची यादी नगर गटविकास अधिकारी सादर करणार आहेत. ही यादी आल्यानंतर प्रारूप आणि अंतिम मतदार यादी प्रसिध्द केल्यानंतर लगेच बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. साधारणपणे जानेवारीचा शेवटचा आठवडा अथवा फेबु्रवारीचा पहिल्या आठवड्यात नगर बाजार समितीची निवडणूक होणार आहे.

No comments:

Post a Comment