शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, November 15, 2021

शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत

 शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत


अहमदनगर -
आज सोमवार १५/११/२०२१ रोजी दुपारी २.३० वाजता शहर पाणी पुरवठा योजनेची नविन मुख्य जलवाहीनीस ( ८०० एम. एम. एम. एस. ) विळद गावाजवळील आढाव पाटील लॉन्स समोरील ठिकाणी नगर- कोपरगांव महामार्ग दुरुस्ती कामाचे खाजगी ठेकेदाराचे पोकलेन मशिनचा धक्का लागुन फुटलेली आहे.
सदर जलवाहीनी दुरुस्तीचे काम महानगर पालीके मार्फत तातडीने सुरू करण्यात आलेले आहे. परंतु त्यास अवधी लागणार आहे.
 त्यामुळे शहर वितरणा साठीच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नाही. परिणामी आज दि.१५/११/२०२१ रोजीचे काही उपनगर भागाचे नियोजीत पाणी वाटप बंद राहाणार असुन ते उद्या दि.१६/११/२०२१ रोजी नेहमीच्या वेळेत करण्यात येईल.
तसेच दि. १६/११/२०२१ व दि. १७/११/२०२१ रोजी रोटेशन नुसार शहराच्या मध्यवर्ती भागास एक दिवस उशिराने पाणी वाटप होणार आहे. तरी नागरीकांनी याची नोंद घेऊन असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. असे आवाहन महानगर पालीकेने केलेले आहे.

No comments:

Post a Comment