अनिल देशमुखांना अटक होणे दुर्दैवी- रोहित पवार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, November 2, 2021

अनिल देशमुखांना अटक होणे दुर्दैवी- रोहित पवार.

 अनिल देशमुखांना अटक होणे दुर्दैवी- रोहित पवार.

माजी गृहमंत्री देशमुखांना मध्यरात्री अटक.


मुंबई -
महाराष्ट्रातील पाच सरकारांच्या काळात 22 वर्षे मंत्री पद भूषविणारे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख काल सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर झाल्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही अटकेची कारवाई दुर्दैवी आहे. अनिल देशमुख चौकशी यंत्रणेला सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं हेच मुळात दुर्देवी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. अनिल देशमुख गेले अनेक दिवस फरार होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही ते ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. परंतु काल सकाळी साडे दहा-अकराच्या सुमारास ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकार्‍यांनी 13 तास त्यांची मॅरेथॉन चौकशी केली. अखेर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here