पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘दैनिक नगरी दवंडी’च्या वतीने पोपटराव पवार यांना सन्मानपत्र प्रदान. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 17, 2021

पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘दैनिक नगरी दवंडी’च्या वतीने पोपटराव पवार यांना सन्मानपत्र प्रदान.

 पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘दैनिक नगरी दवंडी’च्या वतीने पोपटराव पवार यांना सन्मानपत्र प्रदान.

जनतेशी निगडित प्रश्नांची सोडवणूक करणार- पोपटराव पवार.
ग्रामविकास.. पाणीप्रश्न याचबरोबर आगामी काळात

पद्मश्री पुरस्कार हा हिवरेबाजार ग्रामस्थ, मित्र, हितचिंतक, पत्रकारांचा सन्मान.
अण्णा हजारे यांचे प्रेरणेतून राजकारणाऐवजी समाजकारणात उतरलो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिवरे बाजार भेटीचे निमंत्रण स्वीकारले.

मोदी म्हणाले, पोपटराव और क्या-क्या करते हो
  पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करत हिवरे बाजारमधील कार्य व हिवरे बाजार कोरोनामुक्तीची संकल्पना आवडल्याचे सांगत पोपटराव और क्या-क्या करते हो, असे विचारत हिवरे बाजार भेटीचे निमंत्रण स्वीकारल्याचे सांगत त्या दिवसाची मी वाट पाहत असल्याचे सांगितले.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पोपटराव पवार यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल दै.‘नगरी दवंडी’ व नळकांडे परिवाराने सन्मान समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी दै.‘नगरी दवंडी’च्या वतीने सन्मानपत्र देउन पोपटराव पवार यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना पवार यांनी गेल्या 30 वर्षांतील क्रिकेटपासून ते सरपंचपदापर्यंत आलेले राजकीय अनुभव सांगत आगामी कार्याची दिशा स्पष्ट केली.
याप्रसंगी बोलताना पवार म्हणाले की ‘पद्मश्री’ पुरस्कार स्वीकारत असताना जिल्हा शासकीय रुग्णालयातील आग दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आक्रोश कानावर पडत होता. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या शासनाच्या विभागातील अनागोंदी कारभार, बेपर्वाई यावेळी माझ्या ध्यानात आली. त्यापुढे ग्रामविकास, पाणीप्रश्नाबरोबरच जनतेच्या निगडीत प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्नही आगामी काळात करणार आहे
श्री. पवार पुढे म्हणाले, सर्वसामान्य नागरिक, मित्र, प्रसिध्दीमाध्यमे यांनी माझ्यावर जे प्रेम केले त्याची आठवण मला पुरस्कार स्वीकारताना झाली. हा पुरस्कार माझा नव्हे तर माझ्यावर प्रेम करणारे गावकरी, जिल्ह्यातील माझे हितचिंतक, मित्र, पत्रकार यांना मिळाला असे मी समजतो. कोरोना काळात मी, माझी पत्नी, मुलगी, माझ्या गावातील नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. या काळात गाव कोरोनामुक्त करण्याचा मी संकल्प केला व गाव कोरोनामुक्त केले. ‘कोरोनामुक्त गाव’ या हिवरेबाजारच्या संकल्पनेला अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही संकल्पना राज्यात राबविण्याची प्रक्रिया सुरू केली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेतून मी राजकारणाऐवजी समाजकारण करण्याचा निर्णय घेतला असे सांगून पवार पुढे म्हणाले, सामाजिकदृष्ट्या विकसित नसलेल्या हिवरे बाजारमध्ये गाव सुधारण्यासाठी गावातील तरुणांचे संघटन निर्माण करून मी गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. या कार्याची माहिती प्रसिध्दीमाध्यमांनी पुढे आणल्यावर हिवरे बाजार राज्यातच नव्हे तर देशात, जगात प्रसिध्द झाले. हिवरे बाजारच्या ग्रामस्थांच्या श्रमदानातून गावात सुमारे सात कोटी रुपयांची कामे केली. पाण्याचे महत्त्व गावकर्‍यांना पटवून दिले. आता राज्यांत, देशांत विविध ठिकाणांवर बोलावणे येत आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन पाण्याचे महत्त्व मी नागरिकांना समजावून सांगत आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी एलसीबीचे पीआय अनिल कटके, किसनराव नळकांडे, दैनिक नगरी दवंडीचे मुख्य संपादक राम नळकांडे ,कार्यकारी संपादक राजकुमार कटारीया, नगरसेवक श्याम (आप्पा) नळकांडे , मा शिवसेना गटनेतेे संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, मा. शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक संतोष गेनाप्पा ,नगरसेवक प्रशांत गायकवाड, काका शेळके, संतोष नळकांडे, सतीश नळकांडे, दीपक वांढेकर, शिवदास वांढेकर, स्वप्निल गडाख, सचिन शिंदे, बंडू रोहकले, सुशांत शिंदे, प्रवीण लोखंडे, कुमार सुसरे, सुभाष करांडे, अमोल बनकर,नरेश वडलाकोंडा, उदय बनगे, आर्दशगाव हिवरे बाजारचे सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

पद्मश्री पोपटराव पवार यांचे सन्मान समारंभात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी पवार यांना आगामी काळात पद्मभूषण पुरस्कार प्राप्त होईल अशी अपेक्षा करत असताना पोलिस खात्यातील आपले अनुभव विशद केले. सध्या पोलिस ठाण्यात बांधावरची भांडणे अधिक प्रमाणात येत असून बांधावरची भांडणे कमी झाले तर पोलीस स्टेशनची संख्या कमी होईल असे सांगून कटके पुढे म्हणाले की शासकीय नोकरीसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ची आवश्यकता असते बांधावरची भांडणे विनयभंगाचे आरोप होण्यापर्यंत जातात व त्यामुळे नोकरी मिळण्यास अडचण होते.
- अनिल कटके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण

No comments:

Post a Comment