संतोष शिंदे, साहिबा काळे या टोळी प्रमुख व त्यांचे साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई- मनोज पाटील. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, October 18, 2021

संतोष शिंदे, साहिबा काळे या टोळी प्रमुख व त्यांचे साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई- मनोज पाटील.

 संतोष शिंदे, साहिबा काळे या टोळी प्रमुख व त्यांचे साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई- मनोज पाटील.

जिल्ह्यातील दोन गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का लावण्याच्या प्रस्तावास मंजुरी...

अहमदनगर - बेलवंडी, शिरूर, सुपा, कोतवाली पोलिस ठाण्यांना वॉन्टेड असणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील कुख्यात गुन्हेगार संतोष राघु शिंदे व त्यांचे 6 साथीदार तसेच दौंड, सोनई, कोतवाली, नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असणारा दहीगाव येथील कुख्यात गुन्हेगार साहिबा गजानन काळे व त्याचे 4 साथीदार अशा दोन टोळ्यांविरुद्ध मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
5 मे 2021 रोजी बेलवंडी पोलीस ठाण्यात घडलेल्या गुन्हात संतोष राघू शिंदे टोळी प्रमुख, चंदू भाऊसाहेब घावटे वय 28, राजेंद्र बबन ढवळे वय31 वर्ष सर्व रा.राजापूर ता श्रीगोंदा जि अहमदनगर, चेतन काळूराम कदम वय 21 वर्ष, सागर विनोद ससाने वय 21 वर्ष दोघेही रा.देवदैठण ता श्रीगोंदा, राजू उर्फ राजेंद्र मधुकर उबाळे रा कुरुंद ता पारनेर, शफिक शब्बीर शेख वय 34 रा नारायणगव्हाण ता पारनेर जि अहमदनगर हे 7 जण प्रमुख आरोपी आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी, सुपा, तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत तसेच शिरूर पो.स्टे जि.पुणे हद्दीत घातक शस्त्रांसह व अग्निशस्त्र सह दरोडा टाकणे, गंभीर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, चोरी करणे, गैर कायद्याची मंडळी जमवुन दुखापत करणे अशा स्वरूपाचे गुन्हे कट करून व संगनमताने स्वतःचे व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता दहशत निर्माण करून केलेले आहेत. या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)(2),3(2) व 3(4) (मोक्का) अन्वये कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांची मंजुरी मिळाल्याने या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग जि अहमदनगर हे करीत आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारी या टोळी विरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. अशाप्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे टोळी विरुद्ध देखील आगामी काळात मोक्का कायद्यान्वये कारवाई करणार असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी दिलेले आहेत.
27 जुलै 2021 मधील नगर तालुका पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात साहेबा गजानन काळे वय 48 वर्षे रा.दहीगाव ता जि अहमदनगर (अटक) टोळी प्रमुख, परमेश्वर रविकांत काळे वय 20 वर्ष रा.घोसपुरी ता जि अहमदनगर (अटक), शिवदास रामदास भोसले वय 23 वर्षे घोसपुरी ता जि अहमदनगर (अटक), विजय गजानन काळे रा.दहिगाव ता जि अहमदनगर (फरार), समाधान गजानन काळे रा.दहिगाव ता जि अहमदनगर (फरार) हे पाच जण प्रमुख आरोपी आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका, कोतवाली, सोनई पोलीस स्टेशन हद्दीत तसेच दौंड पोस्टे व दौंड रेल्वे पो.स्टे जि. पुणे हद्दीत दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, दरोड्याची तयारी करणे, गंभीर दुखापत करणे अशा स्वरूपाचे गुन्हे कट करून व संगनमताने स्वतःचे व टोळीचे आर्थिक फायदा करीता दहशत निर्माण करून केलेले आहेत. सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम 1999 चे कलम 3(1)(2),3(2) व 3(4) (मोक्का) अन्वये कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांची मंजुरी मिळाल्याने सदर गुन्हाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग अहमदनगर हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here