लहान मुलाशी अनैसर्गिक कृत्य करणारा लष्करी अधिकारी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, October 18, 2021

लहान मुलाशी अनैसर्गिक कृत्य करणारा लष्करी अधिकारी गजाआड.

 लहान मुलाशी अनैसर्गिक कृत्य करणारा लष्करी अधिकारी गजाआड.

न्यायालयाने दिली 20 ऑक्टो.पर्यंत पोलिस कस्टडी.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सावेडी परिसरातील अल्पवयीन मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य करणार्‍या सुखदेवरामा गणेशरामा वय 45 रा.नागोर राजस्थान या लष्करी अधिकार्‍याला तोफखाना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला 20 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
अनैसर्गिक कृत्य करणारा आरोपी लष्करी गणवेशात असल्याची माहिती अल्पवयीन मुलाने दिल्यानंतर पोलिसांनी थोड्या जुजबी माहीती वरुन तपासाला गती दिली व आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
तोफखाना नगर पोलिसांनी चिकाटीने तपास करून लष्करी प्रशासनासमोर पुरावे सादर केले. त्यानंतर अधिकार्‍यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
नगरच्या सावेडी उपनगरात चार दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. त्या दिवशी सायंकाळी एक तेरा वर्षांचा मुलगा सायकलवरून जात होता. त्यावेळी लष्करी गणवेशातील एक व्यक्ती त्याला भेटला. त्याला थांबवून येथे लघुशंका करण्याची जागा कोठे आहे असे विचारून त्याला रस्त्याच्या बाजूला झुडपात ओढत नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आणि कोणाला सांगू नको अशी धमकी देऊन निघून गेला. मुलाने घरी आल्यानंतर आपल्या पालकांना याची माहिती दिली. त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली. आरोपीने लष्करी गणवेश घातला असल्याची माहिती मुलाने पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. चार दिवसांत पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. घटनेच्या दिवशी आरोपी सुखदेवरामा आपल्या सहकार्‍यांसोबत तेथे गेलेला होता. तसे त्याच्यासोबत असलेल्या जवानांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here