शिर्डीत येणार्‍या भाविकांचेही लसीकरण करुन घेणार : खा. डॉ. विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 8, 2021

शिर्डीत येणार्‍या भाविकांचेही लसीकरण करुन घेणार : खा. डॉ. विखे

 शिर्डीत येणार्‍या भाविकांचेही लसीकरण करुन घेणार : खा. डॉ. विखे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः शिर्डी येथे शिर्डी नगरपंचायत ग्रामीण रुग्णालयात राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत येणार्‍या भाविकांसाठी मोफत लसीकरणाचा शुभारंभ करताना खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, श्री गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक रामभाऊ कोते. सर्व नगरसेवक, भाजपचे शहर अध्यक्ष सचिन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ गोकुळ घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डोईफोडे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिर्डी शहरातील नागरीकांसह व्यापारी, दुकानदारांचे संपूर्ण लसीकरण करणारी राज्यातील शिर्डी नगरपंचायत ही एकमेव आहे. येणार्‍या भाविकांचेही लसीकरण करुण घेण्यासाठी राहाता ग्रामीण रुग्णालय आणि शिर्डी नगरपंचायतीने पुढाकार घेतला असल्याची माहीती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला त्या पार्श्वभूमिवर ऑनलाईन पास काढून खा. डॉ. विखे पाटील यांनी श्रीसाईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर भाविकांसाठी सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेचा शुभारंभ केला.
याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिषचंद्र कोते, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, सुजीत गोंदकर, गणेश कारखान्याचे व्हा. चेअरमन तापराव जगताप, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, नितीन कोते, भाजपचे शहर अध्यक्ष सचिन शिंदे, ताराचंद कोते, आरोग्य आधिकारी डॉ. गोकूळ घोगरे आदि याप्रसंगी उपस्थित होते.
मंदिर सुरु होण्याच्या पार्श्वभूमिवर आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगरपंचायतीने शहरातील संपूर्ण नागरीकांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी 1 ते 6 ऑक्टोंबर या कालावधीत शहरातील नागरीकांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहीमेतून शहरातील आठ हजाराहून अधिक नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शहरातील नागरीकांचे लसीकरण पूर्ण करणारी शिर्डी नगरपंचायत ही एकमेव असल्याचे त्यांनी आवर्जून नमुद केले.
आजपासून साईमंदिर उपडल्यामुळे भाविकांची संख्या शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणा-या भाविकांचे लसीकरण व्हावे हा प्रयत्न शिर्डी नगरपंचायत आणि गहराता ग्रामीण रुग्णालयाचा आहे. यादृष्टीने आजपासूनच लसीकरणाची विशेष मोहीम सुरु आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून विशेष पथक नेमून हॉटमध्ये काम करणारे कामगार, पथ विक्रेते यांचे लसीकरण झाल्याबाबतची खात्री करून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले, लोकसंख्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या नागरीकांची संपूर्ण माहीती न घेताच प्रशासनाने काही गावांमध्ये लागू केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या संदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदनही देण्यात आले असून, याबाबत ते निश्चित सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment