स्पर्धेतून तयार होणारे विचार उगवत्या पिढीला समृद्ध करणारे ः इंजि. मुथा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 8, 2021

स्पर्धेतून तयार होणारे विचार उगवत्या पिढीला समृद्ध करणारे ः इंजि. मुथा

 स्पर्धेतून तयार होणारे विचार उगवत्या पिढीला समृद्ध करणारे ः इंजि. मुथा

स्व.अनिलभैय्या राठोड व लोकमान्य टिळक स्मृती निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  कोरोना लॉकडाऊनच्या प्रदीर्घ संकटातून आपण बाहेर पडत असतांना पुन्हा नव्या विचारांनी सज्ज होण्याची गरज आहे. सामान्य माणसासाठी अहोरात्र झटणारे लोकाभिमुख काम करुन सामान्यमाणसांना आपलेसे वाटणारे माजी मंत्री स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या स्मृती जपण्यासाठी तसेच गेली अनेक वर्षे लोकमान्य टिळक यांच्या स्मृती प्रित्यर्थ होणारी निबंध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध अंगी विचारांना प्राधान्य मिळाले आहे. या स्पर्धेतून तयार होणारे विचार उगवत्या पिढीला समृद्ध करणारे असल्याचे प्रतिपादन इंजि.अमृत मुथा यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री स्व.अनिलभैय्या राठोड स्मृती व लोकमान्य टिळक स्मृती निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, उपाध्यक्षा शिल्पा रसाळ, संचालक किरण आगरवाल, प्रा.ज्योती कुलकर्णी, राहुल तांबोळी, दिलिप पांढरे, ग्रंथपाल अमोल इथापे, परिक्षक प्रज्ञा बापट, प्रा.महेश कुलकर्णी उपस्थित होते.
प्रास्तविकात प्रा.शिरिष मोडक यांनी ‘वाचन संस्कृती जपण्यासाठी नवीन पिढी विचारांनी समृद्ध होण्यासाठी वाचनालय सातत्याने स्पर्धा घेते. यातून सुसंस्कारित पिढी निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली.
प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी ‘स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त सन्मानार्थिंना जिल्हा वाचनालयाचे वाचक सभासदस्यत्व वर्षभरासाठी मोफत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.मान्यवरांच्या हस्ते दोन्ही स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा रसाळ, राहूल तांबोळी यांनी केले. परिचय प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी करुन दिला तर आभार दिलिप पांढरे यांनी मानले.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, वाचक, वाचनालयाच्या पल्लवी कुक्कडवाल व कर्मचारवृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here