ऑक्सीजन प्लांट कोनाशिला फोडल्याची पोलीस ठाण्यात तक्रार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 5, 2021

ऑक्सीजन प्लांट कोनाशिला फोडल्याची पोलीस ठाण्यात तक्रार.

 ऑक्सीजन प्लांट कोनाशिला फोडल्याची पोलीस ठाण्यात तक्रार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदे शहरातील ग्रामीण रुग्णालयात उभारलेल्या ऑक्सिजन प्लांट उदघाटनात कोनशीलेवरील नावाच्या प्रोटोकॉलचा वाद रंगला असतानाच, कोनशिला अज्ञात व्यक्तींनी फोडल्याची तक्रार वैद्यकीय अधिकारी डॉ. संघर्ष राजुळे काल रात्री श्रीगोंदे पोलिसात दिली. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
शहरातील ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मात्र तेथे लावलेल्या कोनशिलेवर आपले नाव प्रोटोकॉल नुसार न टाकता खालच्या बाजूला टाकल्याचा आरोप करत भाजपाचे नेते, आमदार बबनराव पाचपुते यांनी पालकमंत्र्यांच्या समोरच अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली होती. अधिकार्‍यांविरुद्ध या प्रकरणी थेट विधानसभेत हक्कभंग दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
पाचपुते यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांनी काष्टी येथे जात पाचपुते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात त्या परिसरात लावलेल्या दोन कोनशिला पैकी एक कोनशिला अज्ञात व्यक्तींनी फोडल्याचे समजताच दुसरी कोनशिला आरोग्य विभागाने काढून घेतली. यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांनी या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांना थेट फोन करीत आता हा पालकमंत्र्यांचा अपमान नाही का ? अशी विचारणा केल्याचे समजते. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमाची कोनशिला कुणाच्या आदेशाने काढली अशी विचारणा केल्यानंतर प्रशासन कात्रीत सापडले आहे. या प्रकरणी समजलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आरोग्य विभागाला नोटीस बजावत याप्रकरणी तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची आदेश केल्याचे समजते त्यानंतर काल रात्री उशिरा डॉक्टर राजळे यांनी श्रीगोंदे पोलिसात तक्रार दिली.

No comments:

Post a Comment