साई दर्शनासाठी नवी नियमावली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 5, 2021

साई दर्शनासाठी नवी नियमावली.

 साई दर्शनासाठी नवी नियमावली.


शिर्डी -
घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, करोनाचा धोका कायम असल्याने संबंधित सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन होणं अत्यंत आवश्यक आहे.याच पार्श्वभूमीवर, आज शिर्डी साई संस्थानाने नवी नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार, येत्या 7 ऑक्टोबरपासून शिर्डीचं साईमंदिर देखील भाविकांसाठी खुलं होणार आहे. मात्र, काही नियम यावेळी लागू असतील. शिर्डी साई संस्थानाच्या नियमावलीनुसार, दररोज 15 हजार भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. त्याचसोबत, दर्शनासाठी जाताना आता भाविकांना हार-प्रसाद घेऊन जाता येणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. शिर्डी साई संस्थानच्या नव्या नियमावलीनुसार 65 वर्षावरील नागरिकांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही तसेच आरतीसाठी फक्त 10 गावकर्‍यांना प्रवेश दिला जाणार आहे.

No comments:

Post a Comment