भूमिपुत्र शेतकरी संघटनतर्फे रविवारी पुनर्बांधणी-पुनर्गठण बैठकीचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 8, 2021

भूमिपुत्र शेतकरी संघटनतर्फे रविवारी पुनर्बांधणी-पुनर्गठण बैठकीचे आयोजन

 भूमिपुत्र शेतकरी संघटनतर्फे रविवारी पुनर्बांधणी-पुनर्गठण बैठकीचे आयोजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
टाकळी ढोकेश्वर ः शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर काम करणारी भूमिपुत्र शेतकरी संघटनेला पुन्हा एकदा बळकटी देण्यासाठी व तळागाळात संघटना पोचविण्यासाठी संघटनेची पुनर्गठन व पुनर्बांधणी बैठक पारनेर तालुक्यातील वरदान ठरलेल्या  मांडओहोळ धरण  येथील शासकीय विश्रामगृहावर संघटनेचे संस्थापक अधक्ष संतोष वाडेकर यांच्या ऊपस्थित आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान या बैठकीमध्ये तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा होणार असून तालुक्यात असलेले शेतीचे प्रश्न, पिक विम्याचा प्रश्न ,पाणीप्रश्न आदी विषयांवर या बैठकीत चर्चा  होणार आहे.  
उत्तरप्रदेशात लखीमपुर येथे लोकशाही मार्गाने शेतकरी आंदोलन करत असताना त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना गाडीखाली चिरडुन मारण्यात येत अतिशय वेदनादायक आहे . विरोधी पक्षही काहीच बोलत नाही . आता शेतकर्यांच्या पोरांनीच संघटीत होऊन ही व्यवस्था गाडुन टाकण्याची पाळी आली आहे.
या बैठकीत तालुका स्तरावर काम करण्यासाठी नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे  पारनेर तालुका अध्यक्ष सचिन सैद व तालुका युवक अध्यक्ष रावसाहेब झांबरे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment