नगरमधील एका मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 18, 2021

नगरमधील एका मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय !

 नगरमधील एका मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय !

आ.विखे पाटलांचा मंत्री थोरातांवर निशाणा
जरा सबुरीने घ्या...लवकरच नाव उघड होईल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल,’ असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. विखे पाटील यांनी कोणाचंही नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. मात्र, त्यांची तोफ ही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याचं दिसून येत.माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा सनसनाटी आरोप केला. हा मंत्री कोण, असं काही माध्यमांनी विचारलं तर राधाकृष्ण विखे पाटलांकडून उत्तर मिळालं ‘जरा सबुरीने घ्या, लवकरच नाव उघड होईल,’ त्यांनी थोरातांचं नाव घेणं जरी टाळलेलं असलं तरी त्यांचा निशाणा मात्र काँग्रेसचे बाळासाहेब थोरातांकडेच होता, हे स्पष्टपणे दिसतं आहे.
थोरात यांच्याकडे महा विकास आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्रीपदाची जबाबदारी आहे. थोरातांच्या खात्यावर बोट ठेवत अप्रत्यक्षरित्या या खात्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं विखे पाटील म्हणाले. त्याबरोबरच नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल, अशी पत्रिका पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर मधील एका कार्यक्रमात केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते. आणि काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, आणि ज्यावेळी विखे पाटील हे काँगेसमध्ये होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकार असताना त्यांनी राज्याचं विरोधी पक्षनेतेपदही सांभाळलं. पण 2019 च्या निवडणुकांत काही राजकीय अंदाज विस्कळीत झाले आणि त्यांनी काँग्रेसलालाच रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशापासून विखे पाटील काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर वारंवार टीका करत असतात. मात्र अस जरी असले तरी थोरात-विखेंमधली सुंदोपसुंदी महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. आता बाळासाहेब थोरातांचं नाव घेऊन नाही पण अप्रत्यक्षरित्या हल्ला चढवत त्यांच्या पापाचा घडा भरलाय असे विखे पाटील म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment