हत्याकांडाने वाळकी हादरली! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 18, 2021

हत्याकांडाने वाळकी हादरली!

 हत्याकांडाने वाळकी हादरली!

आपसातील वादानं डोक्यात दगड घातला.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वाळकी येथील जावेद तांबोळी या 38 वर्षीय भांडे व्यापार्‍याच्या मुलाची किरकोळ वादातील मारहाणीमुळे हत्या झाली. किरकोळ वादातून त्याचे डोक्यात दगड घातल्याने तो जखमी झाल्यामुळे नगर मधील एका खाजगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने भरदिवसा वाळकीत खळबळ उडाली आहे.
सायकल लावण्यावरून लहान मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसण दोन कुटुंबातील वादात होऊन यात एकाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. भांड्याचे व्यापारी गनीभाई तांबोळी यांचा मुलगा जावेद गनीभाई तांबोळीच्या हत्येने तालुक्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.
वाळकी येथे शेजारी शेजारी राहणाच्या दोन कुटुंबातील लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून रविवारी (दि. 17) सकाळी किरकोळ वाद झाला. या वादाचे कुटुंबातील मोठ्या व्यक्तींच्या वादात पर्यावसन झाले. यावेळी जावेद याला पाईपने मारहाण झाली. उपचारासाठी तो जिल्हा रुग्णालयात गेला होता. तेथून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी जात असतानाच गावातील लोकांनी आपसात वाद मिटवून घेऊ असे सांगितल्याने तो परत आला. ग्रामस्थांनी मध्यस्थी करत भांडणही मिटविले होते. मात्र त्यानंतर दुपारी पुन्हा वाद सुरू झाले. जावेद याला घोळक्याकडून मारहाण सुरू झाली. जावेद याने जीव वाचविण्यासाठी पळ काढला. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याला अडवले. एकाने सेंट्रल बँकेसमोर त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे वाळकी गावात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. नगर येथील खासगी रुग्णालयात नातेवाईक व ग्रामस्थांची गर्दी झाल्याने तालुका व भिंगार पोलिसांनी रुग्णालयासह घटनास्थळी बंदोबस्त वाढविला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी स.पो.नि. शिशिरकुमार देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलिसांनी सलीम उस्मान शेख व बाबा शेख या दोघांना ताब्यात घेतल्याचे सपोनि देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, त्यातील एकावर उपचार सुरू आहेत. तर जावेद याचे वडिलही या घटनेत जखमी झाल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment