कमरेला गावठी कट्टा व काडतुसे बाळगणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, October 18, 2021

कमरेला गावठी कट्टा व काडतुसे बाळगणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल.

 कमरेला गावठी कट्टा व काडतुसे बाळगणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल.

रुईछत्तीसी एसटी बस स्थानकात..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रुईछत्तीसी एसटी बस स्थानकावर गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे बाळगणार्‍या राजू कुंडलिक खाकाळ रा.रुईछत्तीसी यास गजाआड करीत कट्टा व काडतुसे जप्त केली आहेत.
रूईछत्तीशी बस स्थानकाजवळ एक तरूण कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जारवाल, पोलीस अंमलदार बी. एस. गांगर्डे, संतोष लगड, योगेश ठाणगे, भानुदास सोनवणे यांच्या पथकाने खाकाळ याला रूईछत्तीशी बस स्थानकावरून ताब्यात घेत त्याची पंचासमक्ष झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी त्याला अटक करत कट्टा, काडतुसे जप्त केली आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस नाईक भानुदास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी खाकाळ विरोधात तालुका पोलीस ठाण्यात विनापरवाना शस्र बाळगण्यास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here