गोदावरी अकॅडमीमध्ये पोलीस भरतीसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 2, 2021

गोदावरी अकॅडमीमध्ये पोलीस भरतीसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू.

 गोदावरी अकॅडमीमध्ये पोलीस भरतीसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पुढील वर्षात एप्रिल 2022 मध्ये होणार्‍या पोलीस भरतीसाठी गोदावरी अकॅडमी 100 मुलांसाठी मोफत मैदानी व लेखी परीक्षेचे प्रशिक्षण देणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाजीराव खांदवे यांनी दिली.
किमान 12 वी पास 18 वर्ष वय पूर्ण असलेल्या सर्व जाती धर्माच्या तरुण/तरूणींसाठी पोलिसात भरती व्हायची ही एक उत्तम संधी आहे. मुलींसाठी उंची किमान 155 सें. मी.तर मुलांसाठी 165 सें. मी. हवी, मेडिकल पास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सशुल्क मेस व होस्टेल उपलब्ध करून दिले जाईल. मेडिकल साठी 200 रुपये 9822107650 या नंबरवर ऑनलाईन जमा करावे लागतील,त्या नंतर मेडिकल साठी तारीख दिली जाईल, मेडिकल पास झाल्यावर प्रवेश निश्चित करण्यात येईल. हे वर्ग 10 नोव्हेंबर पासून गोदावरी अकॅडमी अहमदनगर येथे सुरू होतील, 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान प्रवेश घ्यावा लागेल. मेडिकल प्रवेश प्रक्रिया 6 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होईल. या अगोदर मेडिकल पास झालेले विद्यार्थी या मध्ये सहभागी होऊ शकतात, मेडिकल नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा मेडिकल साठी प्रयत्न करू नये. प्रवेश दिलेल्या मुलांची काही अटींवर भरतीची हमी संस्था घेईल, गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment