जामखेड तहसील येथे मौलाना च्या अटकेचा निषेध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 2, 2021

जामखेड तहसील येथे मौलाना च्या अटकेचा निषेध

 जामखेड तहसिल येथे मौलाना च्या अटकेच्या निषेध

जमियत ए उलमा हिंद चे तालुका अध्यक्ष मौलाना खलील व शहर अध्यक्ष मुफ्ती अफजल पठाण यांचे तहसीलदारांना निवेदन.... 



 नगरी दवंडी

जामखेड - मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना कलिम सिद्दीकी यांना उत्तर प्रदेश सरकारने एटीएस मार्फत केलेली अटक संविधानाच्या विरोधी आहे. त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत. मौलानाच्या अटकेचा निषेध करत त्यांना लवकरात लवकर सोडण्याची मागणी जमियत ए उलमा हिंद व समस्त समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देतांना जमियत ए उलमा जामखेड तालुकाध्यक्ष मौलाना खलील कासमी, शहराध्यक्ष मुफ्ती अफजल पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर राळेभात, बहुजन वंचित आघाडीचे नेते अरूण जाधव, अझरुद्दीन काझी,शामीरभाई सय्यद, नाजिम काझी, शेरखान पठाण, जुबेर शेख, ताहेरखान, उमर कुरेशी, मुख्तार सय्यद, अब्दुलबारी कुरेशी, नजीर सय्यद, समीर पठाण, फहिम शेख, अमित जाधव, वसीम सय्यद, फिरोज बागवान, अतिक पिंजारी, राजुभाई शेख, गनीभाई शेख, अस्लम खान  असे कोरोना नियमामुळे मोजके नागरीक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की मौलाना कलिम सिद्दीकी यांच्यावर लावलेले आरोप निराधार असुन  उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर योगी सरकार राजकीय पोळी भाजून घेत आहे. एटीएस मार्फत समाजात दहशत व जातीय तेढ निर्माण करत आहे. सविधानाने दिलेल्या आधिकाराचे हनन करत आहे. प्रत्येक वेळी कोणाला तरी टार्गेट केले जात आहे. 

राजकीय हेतूने केलेल्या अटकेचा निषेध करत मौलाना कलिम सिद्दीकी यांना लवकर सुटका करण्याची मागणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment