दरोड्याच्या तयारीतील टोळी माळीवाडा परिसरातून गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 9, 2021

दरोड्याच्या तयारीतील टोळी माळीवाडा परिसरातून गजाआड.

 दरोड्याच्या तयारीतील टोळी माळीवाडा परिसरातून गजाआड.

मिरची पावडर, लोखंडी तलवार, कटावणी, गावठी रिव्हॉल्वर सह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  लोखंडी तलवार, कटावणी, मिरची पावडर, गावठी पिस्तूल बाळगणार्‍या पांढर्‍या रंगाच्या इंडिका कार मधून दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला माळीवाडा बस स्थानकाच्या परिसरातून कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून 4 लाख 25 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की काल सायंकाळी पावणे सात च्या सुमारास पोलीस निरीक्षक संपत शिंदे हे कोतवाली स्टाफ सह पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना मुख्य बातमीदार मार्फत बातमी मिळाली की माळीवाडा बस स्टँड परिसरात एक पांढर्‍या रंगाच्या इंडिका कार मध्ये काही इसम दरोड्याच्या तयारीत साहित्य साधना सह येणार आहेत.  ही इंडिका कार चांदनी चौक कडुन माळीवाडा कडे येताना दिसली. त्यानंतर शिंदे यांनी वाहनाचा पाठलाग केला असता हे वाहन माळीवाडा स्टॅन्ड समोरील अंबर प्लाझा येथील मेहेर कॉलनी कडे जाणार्‍या रोडच्या कडेला थांबले असता त्यावेळी त्याच्य कार जवळ एक मोटरसायकल येऊन थांबली. या गाडीतील दोन इसम गाडीतून खाली उतरून मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांशी चर्चा करू लागले. त्या वेळी आमची खात्री झाली की हे काहीतरी दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयित रित्या एकत्रित  आल्याने त्यांना लागलीच शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता प्रवीण संजय गंगावणे (वय 25 वर्षे गुरवपिंपरी ता कर्जत जि अहमदनगर) मुकेश शंकर सावंत (वय 34 वर्ष सांगवी आष्टी ता आष्टी जि बीड) सुनील ललित थापा (वय 57 वर्षे मूळ मुंबई हल्ली रा घोगरगाव ता श्रीगोंदा जि अहमदनगर) सुनील कैलास खरमाटे (वय 35 वर्ष पिंपळगाव टप्पा ता पाथर्डी जि अहमदनगर) शंकर हिरामण शिरसाठ (वय 22 वर्षे रा पिंपळगाव टप्पा ता पाथर्डी जि अहमदनगर) असे असल्याचे सांगितल्याने शिंदे यांनी दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता.
3,25,000/रू.किं.ची एक पांढर्‍या रंगाची टाटा कंपनीची इंडिका विस्टा कार नं. एम एच-12 एन-96, 50,000/रू.किं.ची एक काळया रंगाची हिरो स्प्लेंडर कंपनीची विना नंबरची मोटरसायकल, 25,000/ किमतीचे विविध कंपनीचे मोबाईल, 20,000/रू.किं.ची एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल (अग्निशस्त्र) मॅक्झिन सह,  5,000/रू.किं.ची एक काळया रंगाची वॉकी टॉकी, 300/किमतीचे तिन जिवन्त पितळी राऊंड, तीन लाकडी दांडके, एक लोखंडी तलवार, एक लोखंडी कटावणी, एक मिरची पावडर ची पिशवी 4,25,300/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्ह्यातील आरोपी मुकेश शंकर सावन (वय 34 वर्षे सांगवी आष्टी ता आष्टी जि बीड) याच्याविरुद्ध औरंगाबाद व पुणे जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रांजली सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपतराव शिंदे, मनोज कचरे, योगेश भिंगदिवे, शरद गायकवाड, नितीन शिंदे, भारत इंगळे, सागर पालवे, दिपक रोहकले, विजय हिवाळे, तान्हाजी पवार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment