चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 9, 2021

चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण.

 चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण.

केंद्रीय मंत्री नारायण राणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकमेकांचे तोंडही पाहिले नाही


सिंधुदुर्ग :
चिपी विमानतळाचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकासकामांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. सिंधुदुर्गात झालेल्या विकासासाठी राणे कारणीभूत आहोत. दुसर्‍याचे नाव येऊच शकत नाही, असा निशाणा त्यांनी यावेळी साधला. चिपी विमानतळ उद्घाटन निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यामुळे याबाबत बरीच राजकीय चर्चा सुरू झाली होती. चिपी विमानतळाचे लोकार्पण केले. कोकण वासियांसाठी ऐतिहासिक क्षण होता.
चिपी विमानतळाचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी  केंद्रीय मंत्री नारायण राणे,  उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदींसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमाला हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे ऑनलाईन हजर होते. चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभाआधी राजकीय वाद उफाळून आला होता. याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि नारायण राणे, भाजप यांच्यात चढाओढ दिसून येत होते. त्यामुळे आजचा कार्यक्रमाकडे लक्ष लागले होते. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज उद्घाटन अखेर झाले. ठाकरे आणि राणे आजच्या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाला अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
नारायण राणे बोलायला उभे राहिले. त्यावेळी राणे समर्थकांची घोषणाबाजी केली. यावेळी राणे म्हणाले, राजकारण करू नये असं वाटत होते. मुख्यमंत्री साहेब भेटले आणि कानात बोलले माझ्या.  विमानतळाचे मालक कोण हे आज समजले. तुम्हाला मिळत असलेली माहिती चुकीची आहे. आदित्यवर बोलणार नाही, तो टॅक्स फ्री आहे. वाईट हेतूने येवू नका. चांगल्या मनाने या, असा टोला राणे यांनी यावेळी लगावला.
हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. मुख्यमंत्री आज विशेष विमानाने चिपी विमानतळावर दाखल झाले.
त्यापाठोपाठ मुंबईतून निघालेल्या अलायन्स एअरच्या विमानाने केंद्रीय मंत्री नारायण राणे या सोहळ्याला दाखल झाले. राणे यांच्यासह शिवसेना भाजप नेते विमानात एकत्र होते. पहिले प्रवासी विमान चिपीच्या धावपट्टीवर लँड झाल्यावर विमानावर दोन्ही बाजूंनी पाण्याची कमान करत विमानाला अनोखी मानवंदना देण्यात आली. काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्याचवेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागतच करणार आहोत. मुख्यमंत्री शेजारी असणे हा चांगला क्षण आहे. चिपी विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले आहे.
1990 साली बाळासाहेबांनी या जिल्ह्यात पाठवले. पिण्याचे पाणी नव्हते, रस्ते नव्हते, वीज नव्हती, शैक्षणिक दुरावस्था होती. मुंबईवर अवलंबून असलेल्या जिल्ह्याचा विकास करायचा ठरवला. कुणी विकास केला हे लोक ठरवतील. उद्धवजी, साहेबांच्या प्रेमातून हे सर्व केले, असे राणे म्हणाले. टाटा इन्सिट्यूटने पर्यटन विकासाचा अहवाल मला दिला. त्यानंतर सेना भाजपची सत्ता आली आणि पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत केला. मग सर्व सोयी इथ आणल्या. साहेबांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. रस्त्यांसाठी 120  कोटी, पिण्याच्या पाण्यासाठी 118 कोटी मी दिले. हे बदलतंय ते फक्त नारायण राणेंमुळे. दुसरं कुणाचे नाव नाही येवू शकत
हे सर्व साहेबांचे श्रेय, असे राणे म्हणाले. उद्धवजींना विनंती, मी व प्रभू इथं भूमीपूजनाला आलो होतो. तेव्हा विरोध झाला होता. नाव घेतलं तर राजकारण होईल. कामात कोण अडथळा आणतंय. कोण अडवत होते..विचार त्यांना. सी वर्ल्ड कुणी रद्द केले. भांडे किती फोडायचे,  परिस्थिती बदलतंय. तुम्ही आलात बरे वाटले. आदित्य ठाकरे पर्यटनंमत्री आहेत...त्यांनी अहवाल वाचावा. धरणांची कामे झाली नाहीत. कसला विकास, विमानतळ झाले, जाताना काय खडडे पाहावेत का, असे राणे म्हणाले.

No comments:

Post a Comment