छावा मराठा युवा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 8, 2021

छावा मराठा युवा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन

 छावा मराठा युवा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन

25 रोजी नुकसानग्रस्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह बैलगाडी मोर्चा काढणार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
 सोयाबिन भावात झालेली घसरण तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून एकरी 50 हजार रूपये सरसगट मदत मिळेपर्यंत व विमा मंजूर होई पर्यत पीकविमा मंजूर होई पर्यंत सर्व प्रकारच्या कर वसुल्या स्थगित करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 ऑक्टोंबर रोजी  गुरा ,ढोरा जनावरांसह बैलगाडी मोर्चा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्यावतीने काढण्यात येणार या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष नितीन पाटील पटारे, राज्यसंघटक अशोक चव्हाण पाटील, जिल्हा संघटक दादा बडाख पाटील, तालुकाअध्यक्ष विजय बडाख पाटील, तालुकाअध्यक्ष भाऊसाहेब वाडेकर, एकलव्य ता अध्यक्ष सुभाष मोरे, ज्ञानेश्वर हजारे पाटील, जिल्हा सचिव गणेश गायकवाड पाटील, तालुका अध्यक्ष रमेश म्हसे पाटील, शहर मार्गदर्शक दत्ता वामन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.      
महिन्यामध्ये सोयाबिनच्या दरात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत क्विंटलमागे 6 हजार रूपयेची घसरण झाली. केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात सोयाबिन आयात केल्याचे कारण सांगत व्यापार्यांनी शेतकर्यांची दिवसा ढवळ्या चालवलेल्या लुटीची चौकशी करून कृषी उत्पन्न बाजार समित्या व खासगी ठिकाणी 12 हजारावरून 6 हजार ते थेट 5 हजार रूपयांपर्यंत खाली आलेल्या दराची चौकशी करावी. तसेच विविध ठिकाणी ढगफुटी सदृष्य अतिवृष्टी झाल्याने कापणीला आलेले सोयाबिन,मका,मूग,बाजरी,उडीतपाण्यामध्ये जाऊन 100 टक्के नुकसान झालेले दिसते. तसेच कपाशिच्या, भुईमुगाच्या  शेतात पाणी साचल्याने 70  ते 80 टक्क्यांपर्यंत उत्पन्नात घट येणार असल्या कारणाने तसेच शेतकर्यांना स्वतः ई-पिक पाहणी नोंदविण्यास सांगितले तसे ई-पंचनामा करून ऑनलाईन नुकसानीची माहिती घेऊन तातडीने एकरी 50 हजार रूपयांची मदत शेतकर्यांना मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. तोपर्यंत शेतकर्यांकडून महसूल वसुली, ग्रामपंचायत थकबाकी वसुली, कर्ज वसुली, वीजबील वसुली, पाणीपट्टी वसुली या सर्व वसुल्यांना स्थगिती देण्यात यावी. अन्यथा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर  नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसह 25 ऑक्टोबर सोमवार गुरा ढोरा जनावरेसह  बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment