अल्पवयीन विवाहितेचे बालिकेसह अपहरण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 8, 2021

अल्पवयीन विवाहितेचे बालिकेसह अपहरण.

 अल्पवयीन विवाहितेचे बालिकेसह अपहरण.

कोतवाली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल..

अहमदनगर : नवरात्रीत स्त्रीशक्तीचा जागर करण्यात येतोय. एकीकडे स्त्रीशक्तीच्या विविध रुपांची पूजा करण्यात येतेय. तर दुसरीकडे अशी दुर्दैवी घटना घडतेय.एका अल्पवयीन मुलीचा लग्नाला विरोध असताना आईने एका नात्यातील तरुणाशी तिचे बळजबरीने लग्न लावलं आहे. अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी येथील कोतवाली पोलिस ठाण्यात मुलीची आई, पती व सासर्‍या विरोधात अत्याचार, पोक्सो, बालविवाह प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पीडित अल्पवयीन मुलीला जिल्हा शासकीय रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता तेथून तिच्यासह तिच्या बालिकेचे अपहरण झाले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली महिला पोलिसाने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके हे पुढील तपास करीत आहे. कोतवाली आणि तोफखाना पोलिसांची पथके पीडितेचा शोधासाठी रवाना झाली आहेत. नगर शहरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीचा लग्नाला विरोध असताना आईने एका नात्यातील तरुणाशी तिचे बळजबरीने लग्न लावले होते. पतीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने तिने एका बालिकेला जन्म दिला. त्याला जुगाराचा नाद लागल्याने तो जुगारात पैसे हरल्यानंतर घरी येऊन त्रास देत होता. ती या त्रासाला कंटाळून आईकडे राहण्यास आली. पीडिताने चाईल्ड लाईनची मदत घेत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी या मुलीला व तिच्या बाळाला घेऊन जिल्हा रूग्णालयात काल वैद्यकीय तपासणीसाठी आले होते. तेथून विवाहितेसह बालिकेचेही अपहरण करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment