सलग श्रमदानाच्या वर्षपूर्तीतून कर्जतमध्ये उभारले मोठे सामाजिक काम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 4, 2021

सलग श्रमदानाच्या वर्षपूर्तीतून कर्जतमध्ये उभारले मोठे सामाजिक काम

 सलग श्रमदानाच्या वर्षपूर्तीतून कर्जतमध्ये उभारले मोठे सामाजिक कामनगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः एक वर्ष दररोज सकाळी एक तास श्रमदान करत कर्जत शहरात स्वच्छता, वृक्षारोपन, जनजागृती करणार्‍या सर्व सामाजिक संघटनाच्या वर्षपूर्ती सलग श्रमदानाची या कार्यक्रमात एकाच वेळी सहा हजार झाडे लावून श्रमदान करणार्‍या श्रमप्रेमीचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कर्जत शहरात गेली एक वर्षांपासून अनेक व्यक्ती एकत्र येत गट तट, राजकारण, लहान मोठा, गरीब श्रीमंत हे सर्व बाजू ठेऊन सर्व सामाजिक संघटना या नावाने एकत्र येत श्रमदान करत आहेत या कामास सलग एक वर्ष पूर्ण केल्याबद्दल वर्षपूर्तीचा तीन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये महाश्रमदानातून सहा हजार झाडे लावण्यात आली, यावेळी माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण रक्षणाची सर्वानी शपथ घेतली, यानंतर झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल तोरडमल यांनी करताना गेली वर्षभराचा आढावा मांडला, या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण  अभिनेत्री गौरी कुलकर्णी व प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे हे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात वर्षभर निरपेक्ष सेवा करणार्‍या श्रमप्रेमीचा नगर पंचायतच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी  महाराष्ट्र राज्य अटल पणन अभियानाचे मुख्य व्याख्याते गणेश शिंदे यांनी बोलताना सर्वाना अंतरमुख होऊन विचार करायला भाग पाडताना माणसाने निसर्गाशी नाळ जोडली तरच पुढील आयुष्य निरोगी असेल यासाठी पर्यावरण संवर्धनाला भावी आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व द्यावे लागेल.  वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, आज भौतिक सुखाने माणूस त्रस्त झालेला आहे त्याला सुखी आणि समाधानी ठेवण्यासाठी निसर्गच मदत करू शकतो असे प्रतिपादन शिंदे यांनी केले. अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनी
कर्जतमध्ये सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्वच्छता आणि निसर्ग संवर्धनाच्या कार्यक्रमात मी सेलिब्रिटी नाही तर आपण सर्व पिवळ्या कपड्यातील व्यक्ती सेलिब्रेटी आहात असे म्हणत मी या कामाने भारावून गेले आहे अशीच मोहीम गावागावात सुरू झाली तर निश्चितच महाराष्ट्राचे चित्र बदललेले दिसेल असे म्हटले.
माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याचे कौतुक केले  येथे सुरु असलेल्या स्वच्छता आणि निसर्ग संवर्धन या कार्यामुळे कर्जतकरांचे नाव निश्चितच राज्य आणि देशपातळीवर जाईल यात शंका नाही. जलयुक्त शिवार योजनेची कर्जतने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला होता व माझी वसुंधरा स्पर्धेत ही आता राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असून यापुढे राज्यात प्रथम कसे येऊ याचे नियोजन केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.  सर्व सामाजिक संघटनेचे मागील 365 दिवसांपासून सुरू असून त्यास आपणही जोडलेले आहोत आणि यापुढे देखील कायम राहू असे आश्वासन दिले.
यावेळी आमदार रोहित पवार यांनी म्हणाले कि, पिवळा टी शर्ट स्वच्छतादूताचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. कर्जतच्या सर्व सामाजिक संघटनेच्या सर्व शिलेदारानी पिवळा टी शर्ट परिधान करीत कर्जत शहराचा चेहरा-मोहरा बदलला आहे. सर्व सामाजिक संघटनांचे सर्व स्वयंसेवकांनी केलेले कष्ट निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत. भविष्यात कर्जतचे नाव उंचावण्यासाठी या अभियानासाठी सर्वतोपरी मदत केली आहे व पुढे ही काहीही मदत लागेल ती सांगा मी पूर्ण करील  असे म्हटले. यावेळी सायकल जागजागृती रॅली व या कार्यक्रमाचे लकी ड्रॉ काढण्यात आले.
या अभियानात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कर्जत शहरातून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे वर्षपूर्ती निमित्त या अभियानात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणार्‍यांना सन्मानित करण्यात आले यावेळी अनेकांनी रोख स्वरूपात मदत जाहीर केली. मंचावर उपविभागीय अधिकारी तथा कर्जत नगरपंचायतचे प्रशासक डॉ. अजित थोरबोले, उपस्थित होते. कार्यक्रमास  उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, वनविभागाचे सागर केदार, बारामती अग्रीकल्चरल डेव्हलपमेंटचे राजेंद्र पवार, बारामती अग्रीकल्चरल डेव्हलपमेंटच्या विश्वस्त सुनंदाताई पवार, व्हीआयपीज समूहाचे विनोद कुटे , एनसीसी चे कॅप्टन संजय चौधरी यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पिवळ्या शर्टचे श्रमप्रेमी व एनसीसी कॅडेट एक सारख्या ड्रेस मुळे सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी आंबीजळगावचे सरपंच विलास निकत यांनी आपल्या वाढदिवसावरील खर्च टाळून एक लाख अकरा हजार रुपये तर अतुलराजे जाधव यांनी तेहतीस हजार रु या कामास भेट दिले. शेवटी गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment