युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या जिल्हा सचिवपदी करपडीचे सुनील काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 4, 2021

युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या जिल्हा सचिवपदी करपडीचे सुनील काळे

 युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या जिल्हा सचिवपदी करपडीचे सुनील काळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या जिल्हा सचिव पदी कर्जत तालुक्यातील करपडीचे सुनील काळे यांची निवड करण्यात आली आहे.  
जनसामान्यांची ग्रामपंचायत कारभाराविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने युवाशक्ती ग्रामविकास संगठन तयार करण्यात आले आहे. राज्य अध्यक्ष इमरान पठाण यांनी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्याच्या मुलाखती घेऊन अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली असून यामध्ये जिल्हाअध्यक्ष म्हणून दादासाहेब विधाते यांची तर जिल्हा सचिव पदी करपडीचे सुनील काळे यांची निवड करण्यात आली आहे. हे संघठण  ग्रामपंचायत कारभाराची माहिती,  शासनाच्या ग्रामपंचायत अतंर्गत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती,  चठॠएड (मनरेगा) संबंधित माहिती, घरकुल योजनेची माहिती, ग्रामपंचायत संबंधित शासनाची विविध परिपत्रके (ॠठ),  माहितीचा अधिकार ठढख संबंधित माहिती. आदी  विषयासंबंधी काहीही प्रश्न असतील तर त्यांच्यावर या संघटनेच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन केले जाते, तसेच ग्रामपंचायत मध्ये ग्रामनिधी, वित्त आयोगाचा निधी, कृती आराखडा, अभिलेख व नमुने व इतर ग्रामपंचायत संबंधित माहिती दिली जाते तसेच दरवर्षी निधी किती आला व कोणत्या कामासाठी खर्च झाला याबाबत सर्व माहिती कशी मिळवायची याबाबत मार्गदर्शन केले जाते. जर कुठे पदाधिकारी/ ग्रामसेवक/ ग्रामरोजगार सेवक व्यवस्थितपणे काम करत नाही, गैरव्यवहार करीत आहे या ठीकाणी ही लोकांना मार्गदर्शन करणे. कुठे भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार उघड करण्यासाठी ठढख चा वापर करून कशी व कोणती माहिती मिळवायची या बद्दल माहिती दिली जाते.
युवाशक्ती ग्रामविकास संघटना यांचे वतीने ग्रामपंचायतशी संबंधित माहिती देणे जेणेकरून त्याची सर्व सामान्य लोकांना  मदत होईल असे काम केले जाणार आहे. युवाशक्ती ग्रामविकास संघटना, महाराष्ट्र या संघटनेच्या जिल्हा सचिव पदी काळे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी बोलताना म्हटले की लोकांना पंचायत राज व्यवस्थे विषयी मार्गदर्शन करणे, सर्व सामान्य माणसाला शासनाच्या विविध लोककल्यानकारी योजनाची माहिती देणे, ग्रामपंचायती मधे होत आसलेला भ्रष्टाचार यावर जनजागृती करणे, भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकांना लढण्यास बळ व माहिती देण्याकरीता या संघनेची स्थापना करण्यात आली आहे. या उद्देशाने माझी मुलाखती घेतल्या नंतर  अहमदनगर जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे.  ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांची क्षमता वाढवण्याच्या उद्देश्याने त्यांना माहीती देने, माहीती अधिकार अधिनियम 2005 संदर्भात जनजागृती करने, सदस्य मासिक सभा व ग्रामस्थ यांना ग्रामसभे विषयी माहिती देने, ग्रामपंचायत रचना लोकांना समजाऊन सांगणे, या व अनेक चांगल्या उद्देश्याने या संस्थेची स्थापना  इम्रान पठाण यांनी केली आहे व ह्याच उद्देशाने सर्वांच्या निवडी केल्या असल्याचे काळे यांनी सांगितले.
काळे यांच्या निवडीनंतर अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment