ग्रामपंचायत हत्तलखिंडी येथे डिजिटल सातबाराचे सरपंच इंद्रभान शेळकेंच्या हस्ते वितरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 4, 2021

ग्रामपंचायत हत्तलखिंडी येथे डिजिटल सातबाराचे सरपंच इंद्रभान शेळकेंच्या हस्ते वितरण

 ग्रामपंचायत हत्तलखिंडी येथे डिजिटल सातबाराचे सरपंच इंद्रभान शेळकेंच्या हस्ते वितर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः स्वातंत्र्याचा अम्रुतमहोत्सव वर्षानिमित्त व 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पासून संपूर्ण राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना सुधारित नमुन्यातील डीजीटल स्वाक्षरीत 7/12 देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून त्यासंदर्भात सातबारा उतारा वितरण ग्रामपंचायत हत्तलखिंडी येथे डिजिटल सातबारा सरपंच श्री इंद्रभान शेळके व तलाठी श्री म्हसलेकर यांचे हस्ते शेतकर्‍यांना मोफत सातबारा देण्यात आले.
यावेळी उपसरपंच श्री बाबाजी शेळके,कर्तव्यदक्ष तलाठी श्री म्हसलेकर,श्री  किसन गायकवाड,श्री सूर्यभान ठुबे,श्री दिनेश गायकवाड,सिताराम गायकवाड,अनिल ठुबे,विशाल शेळके,महादु शेळके व इतरही शेतकरी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.तलाठी श्री म्हसलेकर यांनी सातबारा बरोबरच आठ अ चेही शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले त्याचबरोबर संगणकीय उतार्‍यामध्ये काही तांत्रिक चुक असेल तर त्यासंबंधी दुरुस्ती करण्याचे आवाहन सरपंच यांनी तलाठी यांना करण्यात आले.

No comments:

Post a Comment