भास्करराव धोंडीबा उंडे यांचे वृध्दापकाळाने निधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 9, 2021

भास्करराव धोंडीबा उंडे यांचे वृध्दापकाळाने निधन

 भास्करराव धोंडीबा उंडे यांचे वृध्दापकाळाने निधन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या श्री हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री भास्करराव धोंडीबा उंडे यांचे दि 1 ऑक्टो रोजी वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने अहमदनगर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले . सहकार चळवळीत अग्रगण्य असलेल्या पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील श्री हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तसेच सामाजिक , शैक्षणिक  कार्यात समाजभूषण स्व. विष्णूशेठ पाटील बुवा शिंदे यांच्या समविचारी असणारे, सामुदायिक विवाह सोहळा , गावात औद्योगीक वसाहत निर्माण करून तरुणांच्या हाताला रोजगार निर्माण करुन देणे , श्री हरेश्वर ग्रामीण विकास ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामात नेहमी सहकार्याची व मवाळ भूमिका घेणारे अशी त्यांची ख्याती होती .एक प्रगतीशील शेतकरी आणि पारनेर तालुक्यातील जुन्या पिढीतील एक जुना नामवंत बैलगाडा शौकीन हरपला . कर्जुले हर्या पंचक्रोशीतील एक अजातशत्रू , शांत , संयमी व्यक्तीमत्व हरपल्याने उंडे कुटूंब आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले सुना ,मुलगी , जावई , नातवंडे आणि दुःखद श्री हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ असा परिवार आहे. स्व. भास्करराव उंडे यांचा दशक्रिया विधी उद्या रविवार दि 10 ऑक्टो. रोजी कर्जुले हर्या येथे सकाळी 8 .00 वाजता संपन्न होणार आहे.

No comments:

Post a Comment