आ.संग्राम जगताप, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिली घटनास्थळी भेट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 9, 2021

आ.संग्राम जगताप, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिली घटनास्थळी भेट.

 आ.संग्राम जगताप, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिली घटनास्थळी भेट.

भिंगारमध्ये अग्नितांडव.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भिंगार परिसरातील सदर बाजार लगत असलेल्या नेहरू मार्केटला पहाटे आग लागल्याने भिंगारवासियांना मोठे अग्नितांडव पहावे लागले. रात्री 2.30 ला आग लागल्याचे नागरिकांचे निदर्शनास आले. ऐन सणासुदीच्या काळात ही दुर्घटना घडल्याने व्यावसायिकांवर मोठे संकट कोसळले आहे. या आगीत नेहरू मार्केट मधील 24 पैकी 15 ते 20 दुकाने आगीत भस्मसात झाली आहे. अहमदनगर महापालिका, एमआयडीसी, राहुरी, व्हीआरडी येथील अग्निशामक दलाच्या जवानांना पहाटे 5 वाजता ही आग आटोक्यात आणण्यास यश आले. आ. संग्राम जगताप व  भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी नेहरू मार्केट येथील घटनास्थळी भेट देऊन नुकसान ग्रस्त दुकानदारांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. जगताप यांनी प्रशासनाला आगीत भस्म झालेल्या दुकानाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले.
आ.संग्राम जगताप यांनीही भिंगार येथील नेहरू मार्केटला आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी पोहचण्यासाठी सूचना दिल्या.  भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील शुक्रवार बाजार मध्ये कपडा मार्केटला रात्री 02.30  सुमारास आग लागण्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि देशमुख यांनी तात्काळ नियंत्रण कक्ष यांना बोलून त्यांच्यामार्फत राहुरी, अहमदनगर, एमआयडीसी, व्ही आर डी अशा 4 अग्निशामक दलांना बोलावून घेऊन, ग्राम सुरक्षा यंत्रणा मार्फत ग्रामस्थांना घरातून बाहेर निघण्यास संदेश देऊन,  शहरातील पेट्रोलिंग मोबाईल तसेच अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून घेऊन 05.00 वा च्या सुमारास संपूर्ण आग विझलेली आहे. बाजारांमधील पंधरा दुकाने जळाली असून दहा दुकानांना जळण्यापासून पासून वाचवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सोनवणे मॅडम, शहरातील तोफखाना, कोतवाली, नगर तालुका पेट्रोलिंग मोबाईल, आर सी पी असे हजर होते. कुठलीही जीवित हानी झाली नाही.तात्काळ सर्व रात्र गस्त अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आल्याने त्याचप्रमाणे फायर ब्रिगेड, ग्रामस्त त्यामध्ये भिंगार मधील नगरसेवक,काँटोमेन्ट चे अधिकारी,कर्मचारी आल्याने त्यांच्या मदतीने होणारी जीवितहानी, अशी माहिती कॅम्प पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.
आ.संग्राम जगताप यांनी आज सकाळी आग लागल्याच्या ठिकाणी भेट देऊन लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. व्यवसायिकांचा पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहुन लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे ही ते म्हणाले. यावेळी भिंगाराच्या नागरिकांनी भिंगारसाठी स्वतंत्र अग्निशामक दलाची गाडी मिळवून देण्याची मागणी केली.
भिंगार नेहरू मार्केट मध्ये पहाटे लागलेल्या भीषण आगीत बेकरी, टेलरिंग, किराणा, कॉस्मेटिक, कपड्याचे दुकाने, आदीसह दुकाने पूर्णपणे जळाले. त्यामुळे छोटे-मोठे व्यावसायिकांवर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, आमदार संग्राम जगताप यांनी या व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून घेतले व लवकरात लवकर शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देऊ असे आश्वासन व्यवसायिकांना दिले. यावेळी व्यवसायिक भावूक झाले.
यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, सुरेश बनसोडे, अभिजित खोसे, संजय सपकाळ, मतीन सय्यद, सादिक सय्यद, मुसा सय्यद, कलीम शेख, विशाल बेलपवार, संजय खताडे, सागर चवाडके, अजिंक्य भिंगारदिवे, दीपक लिपाणे, मतीन ठाकरे, सिद्धार्थ आढाव, आदी उपस्थित होते.
भिंगार शहरात आज सकाळी लागलेल्या भयानक आगीत ज्या दुकानदारांचे नुकसान झाले आहे त्यांच्या दुःखात भारतीय जनता पार्टीत सहभागी आहे. दुकानदारांची झालेले नुकसान कधीही भरून न येणारे आहे. भारतीय जनता पक्ष सर्व दुकानदारांच्या मागे उभा रहात मदत करणार आहे. दुकानदारांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी दिले.
भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने भिंगार  येथील नेहरू मार्केट येथील घटनास्थळी भेट देऊन आगीच्या भक्षस्थानी गेलेल्या दुकानदारांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, भिंगार छावणी परिषदेचे मुख्याधिकारी विद्याधर पवार यांच्याशी संपर्क करून परिस्थितीच्या गांभीर्याची माहिती दिली. तसेच तातडीने घटनेचा पंचनामा करून दुकानदारांना त्वरित मदत करावी अशी विनंती केली.
वसंत राठोड म्हणाले, शनिवारच्या पहाटे नेहरू मार्केट येथे दुकानांना लागलेल्या आगीमध्ये सर्वसामान्य दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटे आग लागल्यावर तातडीने मदतकार्य सुरू केले. दुकानदारांचे झालेल्या  नुकसानाची भरपाई शासनाने त्वरित द्यावी. करोना मुळे आधीच सर्व दुकानदार संकटात सापडले आहेत. या घटनेमुळे येथील दुकानदार अधिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे तातडीने दुकानदारांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा, संतोष गांधी, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, सदस्या शुभांगी साठे, जोत्स्ना मुंगी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment