कृषिकन्या कोमल वेठेकरचे शेतकर्यांना मार्गदर्शन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सोनेवाडी (चास) येथे सोने कृषी विद्यापीठांतर्गत च्या ग्रामीण कृषि कार्यानुभव 2020-21 च्या कार्यक्रमाला सुरुवात केली. स्थानिक शेतकर्यांशी संवाद साधून सामाजिक व आर्थिक परिस्थितीबाबत माहिती घेतली. सदरातील कार्यक्रमात माती परीक्षण करून त्यातील कमी-अधिक घटकांबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन केले शेतकर्यांना बीज प्रक्रिया. चारा प्रक्रिया. शेतीक्षेत्रातील अॅपचा वापर, निंबोळी अर्क बनवणे, एकात्मिक तण व्यवस्थापन, रासायनिक खते तसेच औषधांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी कंपोस्ट खत बनवणे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व त्याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.हरी मोरे व श्रीमती पेरणे एस एम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कृषी कन्या कोमल वेठेकर हिचा शेतकरी व ग्रामस्थांनी सत्कार केला.
No comments:
Post a Comment