लॉकडाऊन’ची व्याप्ती वाढली. आणखी 8 गावांमध्ये कडकडीत बंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 5, 2021

लॉकडाऊन’ची व्याप्ती वाढली. आणखी 8 गावांमध्ये कडकडीत बंद.

 लॉकडाऊन’ची व्याप्ती वाढली. आणखी 8 गावांमध्ये कडकडीत बंद.

खायचं काय? जगायचं कसं?; व्यापार्‍यांमध्ये संताप.

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर आणि पारनेर तालुक्यात परिस्थिती थोडी गंभीर बनायला लागलेली आहे. म्हणून तिथे गमे विभागीय आयुक्त व राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी आहेत. अहमदनगरच्या पारनेर तालुक्याला लागून इकडे पुणे जिल्हा सुरु होतो. तर पलिकडे संगमनेरला लागून नाशिक जिल्हा सुरु होतो. ही दोन्ही मोठी शहरं आहेत. एकदा ते कंट्रोलमध्ये नाही आलं आणि वाढलं तर त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो. ससून रुग्णालयात किती रुग्ण दाखल आहेत, त्यातील 40 टक्के रुग्ण हे नगर जिल्ह्यातील आहेत. म्हणून आम्ही ही गोष्ट गांभीर्यानं घेतली की 40 टक्के रुग्ण एकट्या नगर जिल्ह्यातून आलेत. तिथे नेमकं काय घडलं? तिथे मग संगमनेर तालुका, पारनेर तालुक्यात रुग्ण सापडत आहेत. जिल्हाधिकारी, प्रशासनाचे अधिकारी, स्वत: बाळासाहेब थोरात, आमदार निलेश लंके तिथे जात आहेत, पाहणी करत आहेत. मग त्यानंतर ठरलं की गावबंदी करावी. - अजित पवार, उपमुख्यमंत्री.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्हा प्रशासनाने करोना प्रसार रोखण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी 61 गांवामध्ये कडक निर्बंध लागू केले. त्यात आता आणखी 8 गावांची भर पडली आहे. नेवासा तालुक्यातील चांदा, पारनेर तालुक्यातील निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, संगमनेर तालुक्यातील राजापूर, पिंप्री लौकी, आजमपूर, शेवगाव तालुक्यातील वडुले बु.अशी आठ गावं सील करण्यात आली आहे. दि.5 ते 14 ऑक्टोबर दरम्यान या गावात फक्त अत्यावश्यक सेवा खुल्या राहतील. नवरात्र, दसरा, दिवाळीच्या तोंडावर नगर जिल्ह्यात लॉकडाउनची व्याप्ती वाढत असल्याने स्थानिक पातळीवर व्यापारी व नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
तिसर्‍या लाटेचं संकटही अजून कायम आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील 69 गावांमध्ये आजपासून लॉकडाऊनचे आदेश देण्यात आलेत. या आदेशानुसार मेडिकल आणि दवाखाना वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाला व्यापार्‍यांनी तीव्र विरोध केलाय. आम्ही खायचं काय आणि जगायचं कसं? असा सवाल इथल्या व्यापार्‍यांनी केला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून लावण्यात आलेले लॉकडाऊनचे निकष बदलण्याची मागणी व्यापारी करत आहेत. जिल्ह्यात ज्या गावांमध्ये 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना रुग्ण आहेत, अशा गावांमध्ये जिल्हाधिकार्‍यांकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. मात्र, सणासुदीच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला व्यापार्‍यांनी तीव्र विरोध केलाय. दोन वर्षांपासून आधीच लॉकडाऊन असल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या निकषात बदल करण्याची मागणी व्यापारी करत आहेत.

नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा...
  नाशिक - अहमदनगर जिल्ह्यातील 69 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर आणि नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे नाशिकरांची चिंता वाढली आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे. यामुळे नाशिकरांची चिंता वाढली आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे.

औरंगाबादमध्ये खबरदारी...
  औरंगाबाद- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे 69 गावांत 13 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी पत्र देऊन चेकपोस्टवरील सुरक्षा वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळा सुरू झाल्या असून, सर्व काही आलबेल असल्यासारखे वाटत असतानाच शेजारच्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. अहमदनगरकडून जिल्ह्यात येणार्‍या सर्व प्रमुख मार्गांच्या चेकपोस्टवर येणार्‍या प्रवाशांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात येण्यापासून कुणाला रोखण्यात येणार नाही, परंतु चेकपोस्टवर प्रवाशांना लसीकरण केल्याबाबत विचारणा करण्यात येईल. तसेच काही आजार आहे की, याची माहिती घेण्यात येईल. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या 153 कोरोनाचे रुग्ण आहेत. मृत्यदर देखील मोठ्या प्रमाणात घटला आहे. परिस्थिती अशीच नियंत्रणात राहावी, यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व प्रशासकीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment