7 वर्षांच्या मुलाचा नरबळी, हळद कुंकू लावून टाकण्यात आला मृतदेह. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 5, 2021

7 वर्षांच्या मुलाचा नरबळी, हळद कुंकू लावून टाकण्यात आला मृतदेह.

 7 वर्षांच्या मुलाचा नरबळी, हळद कुंकू लावून टाकण्यात आला मृतदेह.


कोल्हापूर :
महाराष्ट्राला हादरवणारी घटना कोल्हापुरात घडली आहे. एका सात वर्षीय मुलाचा नरबळी देण्यात आला आहे. या घटनेनं सपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 7 वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याचा नरबळी देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कापशीमध्ये नरबळी देण्यात आळा आहे. अपहरण केलेल्या 7 वर्षीय आरव केशव केशरे याचा नरबळी दिला आहे. आरवच दोन दिवसांपूर्वी अपहरण झाल होतं. शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावातील धक्कादायक घटना समोर आली आहे.  आरवचा मृतदेह घरामागे हळद कुंकू लावून टाकण्यात आला होता. यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. पहाटे 6 वाजता आरवचा मृतदेह घराबाहेर सापडला. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी याठिकाणी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने गुप्तधन मिळवण्यासाठी आपल्या पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला आहे. पण पीडितेनं वेळीच प्रसंगावधान दाखवत पतीचा विरोध केल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीसह एका व्यक्तीला आणि मांत्रिक महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here