हिवरे कोरडा येथे नवरात्र उत्सवानिमित्त मळगंगा मंदिर व परिसरात राहिलेल्या कामाला वेग - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 4, 2021

हिवरे कोरडा येथे नवरात्र उत्सवानिमित्त मळगंगा मंदिर व परिसरात राहिलेल्या कामाला वेग

 हिवरे कोरडा येथे नवरात्र उत्सवानिमित्त मळगंगा मंदिर व परिसरात राहिलेल्या कामाला वेग


नगरी दवंडी/प्रतिनिधी
हिवरे कोरडा ः नवरात्र उत्सव निमित्त सर्वत्र कामाची लगबग दिसून येत आहे , मंदिरात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो, या नवरात्र उत्सव निमित्त मुंबई , पुणे , नगर , नाशिक , या ठिकाणाहून हजारो भाविक दर्शना साठी येतात , या नवरात्र उत्सववास भाविकांची अलोट गर्दी  दिसून येण्याची दाट शक्यता आहे.
 कारण घटस्थापनेपासून म्हणजे नवरात्र पहिल्या दिवसासह मंदिरं तब्बल काही महिन्यानंतर उघडणार आहे , मळगंगेच्या राहिलेल्या कामांना हि वेग आला आहे, मंदिराची दरवर्षी स्वछता केली जाते , स्वच्छता ची लगबग दिसून येत आहे , संपूर्ण मंदिर स्वच्छ करण्यात येते , मळगंगा मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई संपूर्ण मंदिरास केली जाते , या मुळे नवरात्र काळात मंदिराचे सौंदर्य अधिक खुलुन दिसुन येते , मंदिर उघडणार या पाश्वभूमीवर आपले पुजारी गोळे काका व झुंबर मावशी तसेच ग्रामस्थ उत्सवाची जोरदार तयारी करण्यात दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment