येरवड्यातुन 97 लाख रु. पळविणारे, नगर जिल्ह्यातील दोन युवक गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 8, 2021

येरवड्यातुन 97 लाख रु. पळविणारे, नगर जिल्ह्यातील दोन युवक गजाआड.

 येरवड्यातुन 97 लाख रु. पळविणारे, नगर जिल्ह्यातील दोन युवक गजाआड.

कर्जत-पुणे पोलिस पथकाची संयुक्त कारवाई...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कर्जत व पुणे पोलिसांच्या संयुक्त कारवाईत येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात 97 लाख रुपयांची बॅग चोरून पसार झालेल्या जामखेड येथील विजय महादेव अलगुडे यास पुणे पोलीस व कर्जत पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले असून या गुन्ह्यातील 60 लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले असून उर्वरित रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
5 ऑक्टोबर रोजी 97 लाख रुपयांची बॅग चोर चोरी करून विजय हरगुडे आणि त्याचे साथीदार पसार झाले होते. या दोघांचा शोध येरवडा पोलिस आणि पुणे शहराची गुन्हे शाखा पदक घेत होते. या दरम्यान येरवडा पोलिसांनी कर्जत पोलिसांना देखील याची माहिती कळवली. त्यानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सूचना दिली होती. कर्जत पोलीस तपास करत असताना सदरचे आरोपी वीर (ता. पुरंदर जिल्हा पुणे) येथे असल्याची खात्रीशीर बातमी बातमीदाराकडून मिळाली. आरोपी कर्जत-जामखेड परिसरातील असल्याने त्यांची गुन्ह्याची पद्धत माहिती असल्याने कर्जत पोलिसांनी तात्काळ हालचाली केल्या.
क्राईम युनिट 5 च्या जवानांनाही वीर येथे येण्याबाबत कळविले. आरोपी वीर (ता. पुरंदर, जिल्हा पुणे) या ठिकाणी जाउन शाळेजवळ लपून बसलेले होते. यावेळी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी नाना माने सापडला आणि आरोपी विजय हुलगुंडे पळून गेला. त्यास कर्जत पोलिसांनी पाठलाग करून पकडला. आरोपींना कर्जत पोलीस ठाण्यात आणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोस्टेचे तपासी अंमलदार सहाय्यक निरीक्षक रवींद्र आळेकर आणि क्राईम युनिट 5 चे सहाय्यक निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या ताब्यात देण्यात आले. विजय महादेव हुलगुंडे (वय 25 वर्ष रा .राहणार काटेवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर) व त्याला मदत करणारा आरोपी नाना रामचंद्र माने (वय 25 वर्षे राहणार मलठण तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर) या दोघांना ताब्यात देण्यात आले. कर्जत आणि पुणे पोलिसांनी कसून चौकशी केली. आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले. पुणे पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, प्रसाद लोणारे व त्यांचे पोलीस जवान यांनी कर्जत पोलिसांच्या मदतीने 60 लाख रु हस्तगत केले असून कर्जत पोलिसांनी रक्कम हस्तगत करण्यासाठी मोठी मदत पुणे पोलिसांना केली. पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पुणे शहर पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार श्याम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम कर्जत पोलिस स्टेशन तसेच पोलीस निरीक्षक युनूस शेख, हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, रवींद्र आळेकर, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, अश्रूबा मोराळे, अमजद शेख, कैलास डुकरे, चेतन चव्हाण, गणेश वाघ पुणे शहर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment