वनसेवा परीक्षेत ओंकार ढोलेची बाजी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 1, 2021

वनसेवा परीक्षेत ओंकार ढोलेची बाजी.

 वनसेवा परीक्षेत ओंकार ढोलेची बाजी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यात ओंकार शंकर ढोले यांची रेंज फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) या पदावर निवड झाली आहे. वन सेवा परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी घवघवीत यश मिळविले. त्याचे प्राथमिक शिक्षण जि.प. शाळा कुकाणा माध्यमिक शिक्षण नवोद्य व शेवगाव येथील काकडे विद्यालयात झाले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पुणे येथे संपादन करून ओंकार स्पर्धा परीक्षांकडे वळले. ओंकार जि.प.प्राथमिक शिक्षिका आशा ढोले यांचा मुलगा असून सध्या मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर कार्यरत आहे. प्रशासकीय सेवेत काम करताना नियोजन पद्धतीने अभ्यास, जिद्द आणि सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्याचे ते सांगतात. समाजाच्या विविध स्तरातून ढोले यांचे अभिनंदन केले जात आहे. 


No comments:

Post a Comment