रोटरी क्लबच्या उपक्रमामुळे मधुमेहाबाबत चांगली जागृती : डॉ. गाडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 30, 2021

रोटरी क्लबच्या उपक्रमामुळे मधुमेहाबाबत चांगली जागृती : डॉ. गाडे

 रोटरी क्लबच्या उपक्रमामुळे मधुमेहाबाबत चांगली जागृती : डॉ. गाडे

रोटरी क्लब अहमदनगरच्या मोफत शुगर तपासणीस प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
भारतात मोठ्या वेगाने मधुमेह आजार वाढत आहे. मधुमेह होवूच नये यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. डायबेटीस हा आजार एकदम होत अन् झाल्यावर आयुष्यभर जात अहि.  त्यामुळे तरुण पणापासून नागरिकांनी स्वत:ची काळजी घेत वेळोवेळी तपासण्या करणे  अत्यावश्यक आहे. रोटरी क्लबच्या रक्तशर्करा तपासणी उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मधुमेहा बाबत चागंली जागृती होईल, असे प्रतिपादन हृदयरोग तज्ञ डॉ.संदीप गाडे यांनी केले.
वर्ल्ड हार्ट डे निमित्त रोटरी क्लबच्या अहमदनगर वतीने नगर शहरात होमिओपॅथी कॉलेज, आनंदऋषी हॉस्पिटल व डॉ.साताळकर हॉस्पिटल या तीन ठिकाणी नागरिकांची मोफत रक्तातील शुगर तपासणी करण्यात आली. अहमदनगर होमिओपॅथी कॉलेज येथे डॉ.गाडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत बोगावत, सचिव पुरुषोत्तम जाधव, कॉलेजचे अध्यक्ष डॉ.भूषण अनभुले, रोटरीचे माधव देशमुख, नेहा जाधव, विजय तनपुरे, भक्ती बोगावत, प्राचार्य  डॉ.सुनील पवार, डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.सुधा कांकरिया, दिलीप कर्नावट, महावीर मेहेर आदींसह होमिओपॅथी कॉलेजचे प्राध्यापक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविकात रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत बोगावत म्हणाले, रोटरी क्लब भारतभर लाखो नागरिकांची रक्तशर्करा तपासणीचा मोठा उपक्रम राबवत आहे. वर्ल्ड रेकोर्ड करणार्‍या या उपक्रमात रोटरी क्लब अहमदनगर खारीचा वाटा उचलत आहे. शहरात तीन ठिकाणी झालेल्या रक्त तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
डॉ.भूषण अनभुले यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत रोटरीच्या कार्यात सहभागी होवू असे सांगितले. सचिव पुरुषोत्तम जाधव यांनी आभार मानताना रोटरी क्लब अहमदनगर च्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

No comments:

Post a Comment