वारणवाडी येथे 82.ं15 लक्ष रुपयाच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 4, 2021

वारणवाडी येथे 82.ं15 लक्ष रुपयाच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

 वारणवाडी येथे 82.ं15 लक्ष रुपयाच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः वारणवाडी ता. पारनेर येथील आदिवासी बांधव राहात असलेल्या वस्तीसाठी नवीन अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी 8.50 लक्ष व मुक्ताई मंदिर सभामंडप करण्यासाठी 3 लक्ष  यासह विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले या गावच्या शाळेतील मुलांसाठीही हात धुण्यासाठी हॉडवॉस ही देण्यात आले आहे तसेच गटातील बाकी शाळांसाठी ही देण्यात आले जिल्हा परिषद निधी अंतर्गत ज्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे लाईट बिल थकलेले आहे त्यासाठी टाईड(बंदिस्त) निधीमधून सोलर बसवण्याचा माझा विचार आहे यासाठी मसोबाझाप पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर प्रथम सोलर बसणार असून त्यामुळे गावाला लाईट बिल भरण्याचा बोजा पडणार नाही सदर योजना पूर्ण झाल्यानंतर शेजारील खडकवाडी सह परिसरातील जवळपास सर्वच गावांना या योजनेचा लाभ देण्याचा माझा प्रयत्न राहील खर्‍या अर्थाने ही कामे महत्त्वाची आहेत समाजाची गरज आणि त्यातून सुटणारे प्रश्न यासाठी खर्‍या अर्थाने आपल्या बुद्धीचा किंवा कौशल्याचा उपयोग केला पाहिजे असेही सभापती दाते म्हणाले.
यावेळी वारणवाडी चे सरपंच संतोष मोरे, कर्जुले हरेश्वर चे सरपंच संजिवनी आंधळे, महिला आघाडी प्रमुख सुनिता मुळे, माजी सरपंच साहेबराव दादा वाफारे, वडगाव सावताळ  सरपंच बाबा शिंदे, पोखरी  सरपंच सतीश पवार, खडकवाडी  उपसरपंच अक्षय ढोकळे, पोखरी  उपसरपंच परसराम शेलार, वारणवाडी  उपसरपंच जानकू दुधवडे , देसवडे सरपंच पोपट दरेकर, ग्रामपंचायत सदस्य विकास रोकडे, विभाग प्रमुख अमोल रोकडे, माजी चेअरमन भाऊसाहेब टेकुडे, दत्ता आहेर, संपत आहेर, कैलास आग्रे, नामदेव दुधवडे, पोपट काशीद, ग्रामपंचायत सदस्य मंदा केदार, माजी चेअरमनअर्जुन पिंगळे, अशोक पिंगळे, तुकाराम कारंडे, रंगनाथ दाते , अशोक आहेर, म्हसोबा झाप शाखाप्रमुख सुधीर दरेकर, युवा शाखा प्रमुख प्रकाश घाडगे ,गोविंद आग्रे, आत्माराम काळे सर, जालिंदर आहे सर, संदीप मोरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आहेर सर यांनी केले तर आभार दत्ता आहेर यांनी मानले.

No comments:

Post a Comment