लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, कोव्हॅक्सिनला तज्ज्ञ समितीकडून आपत्कालीन मंजुरी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 12, 2021

लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, कोव्हॅक्सिनला तज्ज्ञ समितीकडून आपत्कालीन मंजुरी !

 लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, कोव्हॅक्सिनला तज्ज्ञ समितीकडून आपत्कालीन मंजुरी !


नवी दिल्ली ः
आपल्या मुलांसाठी दीर्घकाळापासून करोना लसीची वाट पाहत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे. भारतीय औषध नियंत्रक मंडळाने मुलांसाठी देखील लसीकरणाला मान्यता दिली आहे. माहितीनुसार, भारत सरकारने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिली आहे.
त्यामुळे कोव्हॅक्सिन ही देशातील पहिली लस बनली आहे जी मुलांना आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे. या मंजुरीनंतर, केंद्र सरकार लवकरच 2 ते 18 वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी करेल. मुलांवर लसीकरणासाठी मान्यता मिळण्यापूर्वी कोव्हॅक्सिनला दीर्घकाळ चाचणी करावी लागली. भारत बायोटेकने 18 वर्षाखालील मुलांवर तीन टप्प्यात चाचणी पूर्ण केली. दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सप्टेंबरमध्ये पूर्ण झाल्या. यानंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात आली आहे. प्रौढांप्रमाणेच मुलांनाही कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस दिल्या जातील. आतापर्यंत घेतलेल्या चाचण्यांमध्ये, कोव्हॅक्सिनचा मुलांवर कोणताही वाईट परिणाम दिसला नाही. क्लिनिकल चाचण्यांमध्ये, ही लस 78 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. यानंतर, ही लस केंद्राने मंजूर केली आहे.

No comments:

Post a Comment