राज्यसरकारचा हात भ्रष्टाचाराने बरबटलेला- आ. राधाकृष्ण विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 12, 2021

राज्यसरकारचा हात भ्रष्टाचाराने बरबटलेला- आ. राधाकृष्ण विखे

 राज्यसरकारचा हात भ्रष्टाचाराने बरबटलेला- आ. राधाकृष्ण विखे

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसर्‍याच्या हातात.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सरकारची एवढी बदनामी झालीय की सरकारने सामान्य जनतेचा विश्वास गमावलाय. भ्रष्टाचाराची मालिका आणि सरकारचं अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. महाराष्ट्र बंद करून आपली राजकारणाची पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा रिमोट दुसर्‍याच्या हातात आहे. राज्य सरकारने कितीही नौटंकी केली तरी जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, भ्रष्ट्राचाराचे रॅकेट आता उध्वस्त झालेच पाहिजे. राज्य सरकारचे हात भ्रष्ट्राचाराने बरबटलेत. अहमदनगर जिल्ह्यातील एका मंत्र्याचाही यात समावेश असल्याचा गौप्यस्फोट भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
प्रवरानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचा 72 वा ऊस गळीत हंगामाचा बॉयलर प्रतिपादन समारंभ आ.राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते पार पडला. त्यावेळी विखे पाटील बोलत होते.
लखीमपूरच्या घटनेचे समर्थन कोणीही करु शकत नाही. राज्यात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असताना सरकार मदत करायला तयार नाही. महाविकास आघाडीचं अपयश समोर येत असून मंत्र्यांच्या अधिका-यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येतायत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री फरार असल्याची ही पहिली घटना आहे. आयकरच्या धाडीत हजारो कोटींचा भ्रष्टाचार समोर आलाय. असे अनेकही मंत्री अडकलेले असून कोणाला लक्ष्मी प्रसन्न झाली? कोणाचे हात सोन्याने पिवळे झाले? हे समोर येणारच आहे, असं ही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment