1 लाख 70 हजार रुपयांचा दारूसाठा जप्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 4, 2021

1 लाख 70 हजार रुपयांचा दारूसाठा जप्त.

 1 लाख 70 हजार रुपयांचा दारूसाठा जप्त.

पारनेर तालुक्यातील अवैद्य दारू धंद्याच्या विरोधात एलसीबीची कारवाई.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः
1 ते 2 ऑक्टोंबर दरम्यान पारनेर तालुक्यातील एकुण 5 ठिकाणी छापे टाकून एकूण 1 लाख 70 हजार 900/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये देशी-विदेशी, ताडी, गावठी हातभट्टीची दारू जप्त करून एकुण 6 आरोपीं विरुध्द पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतंत्र पथक तयार करून अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात आली.
जप्त मुद्देमाल 4 हजार रुपये किमतीची 40 लिटर आंबट वास येत असलेली ताडी यातील आरोपीचे नांव : संतोष मधुकर साळवे, वय 42 वर्ष, रा.ढवळपुरी, ता.पारनेर,  मुद्देमाल 4 हजार 130/- रुपये किमतीची देशी-विदेशी दारु यातील आरोपीचे नांव : अनिल सिताराम विधाटे,वय 21 वर्ष, रा.वणकुटे, ता.पारनेर, जि.अहमदनगर, मुद्देमाल 1 हजार 150/- रुपये किमतीची देशी-विदेशी दारु आरोपीचे नांव : पंडा रामभाउ खंडवे, वय 30 वर्ष, रा.पळसी ता.पारनेर, जि.अहमदनगर आणी दत्तात्रय तिकोले, रा.वणकुटे, ता. पारनेर, मुद्देमाल 1 हजार 620/- रुपये किमतीची देशी-विदेशी दारु, आरोपीचे नांव : नितीन मारुती साळवे, वय 45 वर्ष, रा.पळसी, ता.पारनेर, जप्त मुद्देमाल 1 लाख 60 हजार रुपये किमतीची गावटी हातभट्टीची तयार दारु, कच्चे रसायन आरोपीचे नांव : संभाजी बिठ्ठल गव्हाणे, रा.म्हसे, ता.पारनेर,  असा एकुण 1 लाख 70 हजार 900/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन एकुण 6 आरोपी जेरबंद केले आहे.
ही कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधीकारी अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्यांचे पथकातील पोसई सोपान गोरे, पोना संदीप पवार, संतोष लोढे, पोकॉ जालींदर माने, कमलेश पाथरुट, राहुल सोळुंके, सागर सुलाने आदी कर्मचारी यांनी कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment