नगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 4, 2021

नगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन.

 नगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन.

संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा तालुके हॉटस्पॉट.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज पासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. मंदिरेही उघडणार आहेत. राज्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असताना नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, संगमनेर हे तालुके जिल्ह्याच्या सीमेवर आहेत. श्रीगोंदा, पारनेरजवळ पुणे जिल्ह्याची तर संगमनेरला पुणे आणि नाशिक जवळ आहे. दोन्ही जिल्ह्यांतील लोकांची आवक-जावक असते. हे तीनही तालुके हॉटस्पॉट बनू पाहत आहेत.
दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संगमनेरचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी लोकांना सजग राहण्याचे आवाहन केले होते. रूग्ण संख्या कमी नझाल्यास लॉकडाउन लावण्याचाही इशारा दिला होता. राज्यात आज सर्वत्र शाळा सुरू होत आहेत. मात्र, दुसरीकडे नगर जिल्ह्यातील स्थिती भयावह बनू पाहत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 61 गावे ही लॉकडाऊन जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे या गावातील मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद राहतील. आज राज्यात सर्वत्र शाळा सुरू होणार आहेत. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावतील शाळा या बंद राहतील .
आजपासून लॉकडाऊन (तालुका आणि गावे) अकोले - लिंगदेव, वीरगाव, परखतपूर. कर्जत - खांडवी, बाभूळगाव दुमाला. कोपरगाव - गोधेगाव. नेवासा - कुकाणा पारनेर - वडनेर बु., कान्हुरपठार, गोरेगाव, दैठणेगुंजाळ, जामगाव, भाळवणी, पाथर्डी - तिसगाव राहाता - भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, अस्तगाव, कोर्हाळे, लोणी बु., लोणी खु., कोल्हार बु, संगमनेर - गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बु., आश्वी खु., पारेगाव बु., पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगावपान, सायखिंडी, शेवगाव - भातकुडगाव, घोटण, दहिगावने, आव्हाण बु श्रीगोंदा - लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी. श्रीरामपूर- बेलापूर खु., उक्कलगाव, कारेगाव.

No comments:

Post a Comment