अखेर कांदा लिलाव पूर्ववत माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंची मध्यस्थी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 3, 2021

अखेर कांदा लिलाव पूर्ववत माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंची मध्यस्थी

 ......अखेर कांदा लिलाव पुर्ववत

माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांची मध्यस्ती
नगरी दवंडी / प्रतिनिधी 

 अहमदनगर : माजी मंत्री शिवाजी  कर्डीले यांच्या मध्यस्तीने शनिवार पासून बेमुदत बंद करण्यात आलेला कांदा लिलाव पूर्ववत करण्यात आला आहे. 

माल वाहतूकदार व खरेदीदार यांच्यातील वाराई -हमाली संदर्भातील वादामुळे कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला होता.

यासंदर्भात आज वाराई हमाली बाबत संयुक्त मिटींग बाजार समितीच्या सभागृहात मा.आ.शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे उपस्थितीत संपन्न झाली यावेळी हा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी  सभापती अभिलाष घिगे,उपसभापती संतोष म्हस्के, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मा.नंदकिशोर शिकरे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाबा सानप, बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये दि.7 रोजी होणाऱ्या राज्य पातळी मिटींगमध्ये जो निर्णय होईल त्याबाबत दि.8 रोजी पुन्हा नगरमध्ये मिटींग घेवून पुढील निर्णय घेण्यांत येईल. तोपर्यंत जुन्या प्रचलित पध्दतीने काम सुरु ठेवण्यांत यावे असे मा.मंत्री कर्डिले यांच्या मध्यस्थिने ठरलेले आहे. त्यामुळे  बाजार समिती सुरु झाल्याने  शनिवार दि.04 रोजी कांदा लिलाव पुर्ववत सुरु राहणार असून  सर्व शेतकरी बांधवानी आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment