विनयभंगाचे आरोप खोटे. ही तर माझी अग्नीपरिक्षा! किरण काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, September 3, 2021

विनयभंगाचे आरोप खोटे. ही तर माझी अग्नीपरिक्षा! किरण काळे

 विनयभंगाचे आरोप खोटे. ही तर माझी अग्नीपरिक्षा! किरण काळे

एमआयडीसीतील आयटी पार्कवरून आ. संग्राम जगताप व काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंमध्ये आरोप-प्रत्यारोप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
मी छत्रपती शिवाजी महाराजांना, मॉ जिजाऊंना आणि त्यांच्या संस्कारांना मानणारा माणूस आहे. त्यामुळे ज्या माता-भगिनीने, महिलेने माझ्या विरोधात आणि माझ्या सहकार्‍यां विरोधात एफआयआर दाखल केली आहे. तिचा मला अजिबात कोणताही राग नसून तिच्या बद्दल माझ्या मनात मध्ये द्वेष नसून उलट माझी तिच्याप्रती सहानुभूती आहे. आमच्यावर झालेले आरोप हे धादांत खोटे असून ही माझी व माझ्या सहकार्‍यांची अग्निपरीक्षा आहे. या अग्नी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आम्ही निर्भिडपणे तयार आहोत. कारण की आम्ही स्वच्छ आहोत. मी व माझ्या काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही सहकार्‍याने काल आयटीपार्क ची पाहणी करत असताना कोणत्याही महिलेचा विनयभंग, सदर महिलांना शिवीगाळ, धक्काबुक्की, दमदाटी असे कृत्य केलेले नाही असं सांगत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी त्यांचे वरील आरोप आज पत्रकार परिषद घेवून फेटाळले आहेत. या पत्रकार परिषदेत बोलताना किरण काळे यांनी व काँग्रेस टीमने आयटी पार्कच्या केलेल्या पाहणीचे सर्व व्हिडिओ फुटेज पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवांना दाखवले. फिर्यादीने केलेली तक्रार ही राजकीय दबावातून असून ती खोटी आहे अशा प्रकारची भूमिका किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे.
आम्ही पोलिसांची भेट घेऊन त्यांना देखील हे सर्व फुटेज उपलब्ध करून देणार असून त्यांच्याकडे कंपनीने दिलेले फुटेज आणि आमचे फुटेज त्याची पडताळणी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरच होईल आणि नगरकरांसमोर सत्य काय आहे ते येईल. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही ! आमचा कायदा सुव्यवस्था यंत्रणेवर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. माता-भगिनींना, महिलांना, आया-बहिणींना पुढे घालून अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करणे ही या शहराच्या आमदारांना जुनी सवय असून हा त्यांचा जुना धंदा आहे. सन्माननीय आमदार महोदयांनी महिलांना पुढे करण्याऐवजी स्वतः आयटी पार्कला येऊन खुली चर्चा करण्याचे काँग्रेसचे आव्हान स्वीकारले असते आणि त्यातून या शहराला उत्तरे दिली असती तर शहराला आणि या शहरातल्या तरुणाईला बरे वाटले असते. मात्र महिलांना पुढे करणे ही संस्कृती या शहरासाठी घातक असल्याचे ते म्हणाले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here