मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाखांचा जामखेड-कर्जत दौरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 10, 2021

मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाखांचा जामखेड-कर्जत दौरा

 मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाखांचा जामखेड-कर्जत दौरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी जामखेड व कर्जत तालुक्यांचा दौरा केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शिवसेना तालुकाउपप्रमुख संजय काशिद, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद शिंदे, शरद भोरे, नगरसेवक अमित जाधव, नितीन पाटील, अमोल गिरमे, सुंदरदास बिरंगळ, मयुर डोके, लक्ष्मण ढेपे उमर कुरेशी, हरीभाऊ आजबे, जुबेर शेख, गणेश वारे, दादा वारे, डॉ. नरसाळे, राहुल उगले, मनोज भोरे, सुनिल शिंदे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जुन्या बसस्थानकासमोर तोफाची सलामी देत नामदार गडाख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख संजय काशिद, उपप्रमुख गणेश उगले, संजय बेलेकर, अल्पसंख्यांक प्रमुख नासिर खान, सागर गुंदेचा, ज्येष्ठ शिवसैनिक कात्रजकर तात्या, संतोष शिंदे, सुरज काळे, दिपक सुरसे यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
यानंतर बावी येथे सरपंच निलेश पवार यांच्या वस्तीवर घोंगडी बैठकीसाठी ते रवाना झाले पुढे जवळा येथे मुजावर वस्ती वर सावता हजारे यांच्या निवासस्थानी घोंगडी बैठक
नंतर कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथे कोल्हापुरी बंधार्‍याची पाहणी यानंतर शिंदा येथे चंद्रकांत घालमे यांच्या निवासस्थानी घोंगडी बैठक कोंभळी येथे दिपक गागर्डे यांच्या निवासस्थानी घोंगडी बैठक अशा प्रकारे कार्यक्रम होता.

No comments:

Post a Comment